घरमहाराष्ट्रनाशिकजमावबंदीचे उल्लंघन; १९ जणांवर गुन्हा

जमावबंदीचे उल्लंघन; १९ जणांवर गुन्हा

Subscribe

शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. हा आदेश लागू असतानाही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणार्‍या १९ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. हा आदेश लागू असतानाही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणार्‍या १९ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई भद्रकाली, इंदिरानगर, सिडको, पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सिडको, वडाळागाव, अंबड, म्हसरूळ पोलिसांनी केली.

पहिल्या घटनेत शहरात सध्या जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश लागू असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जाकीर हुसेन रूग्णालयजवळ या ठिकाणी काही जण जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत शांतता भंग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस शिपाई एजाज पठाण यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी जमावबंदी आदेश मोडणारे संशयित हसनेन मुस्ताक शेख (२३), इम्तीयाज अली शेख (२३, सर्व रा. भद्रकाली, नाशिक), अरबाज अतजद शेख (२२), गौस अमुन शेख (२२), शरद रमाकांत पगारे (३४) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

दुसर्‍या घटनेत सल्ली पॉईंट,वडाळागांव येथे पाचजण जमावबंदी आदेश उल्लंघन करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस संदीप लांडे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार नवनाथ अर्जुन मोर (३०, सर्वजण रा. वडाळागांव), प्रकाश पाटील (३५), काळू बेंडकुळे (२९), सुरेश जाधव (३४), मच्छिंद्र बुरकुले (३९) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

तिसर्‍या घटनेत नम्रता पेट्रोल पंपासमोर, आदित्य वाईनजवळ, सिडको येथे पाचजण शांतता भंग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार चेतन पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संशयित समाधान बबन थोरात (३५, रा. दत्तकृपानगर, मराठा कॉलनी), प्रविण वसंत देवकर (३१,रा. डिजीपीनगर, माऊली लॉन्सजवळ), वासुदेव चिंधा सोनवणे (३४, रा.हनुमान मंदिराजवळ, नाशिकरोड), विक्रम रामनाथ कराड (३५, रा.निफाड), विष्णू उत्तम वाघ (३५, भाग्योदय कॉलनी, उपेंद्रनगर, सिडको,नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

चौथ्या घटनेत प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील गुलमोहर हॉटेलजवळ जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस हवालदार योगेश शिरसाठ यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित दीपक नामदेव कोकाटे (२४), सोमनाथ भाऊराव बेंडकुळे (४६), अनिल जयराम कोरडे (२४, रा. तिघेजण दिंडोरी), संजय उत्तम टकनसार (४५, रा.कांदा मार्केट, पेठ रोड, नाशिक), बाळू हिरामण धोत्रे (४५, रा. अश्वमेधनगर, पेठरोड, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -