घरमहाराष्ट्रनाशिक‘त्या’ पोलीस वाहनालाही केला दंड; आपलं महानगर इम्पॅक्ट

‘त्या’ पोलीस वाहनालाही केला दंड; आपलं महानगर इम्पॅक्ट

Subscribe

वृत्ताची शहर वाहतूक शाखेने दखल घेत पोलीस वाहनचालकाकडून केला वसूल दंड

वाहतुककोंडी फोडण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतूक शाखा दंड वसूल करीत आहे. दंड फक्त खासगी दुचाकी व चारचाकी वाहनांकडूनच वसूल केला जातो. बेशिस्त पोलीस किंवा सरकारी वाहनाचालकाकडून दंड वसूल केला जात नाही, असे आरोप अनेक वाहनचालक करतात. यासंदर्भात ‘यांना कोण दंड करणार?’ या मथळ्याखाली छायाचित्र दैनिक ‘आपलं महानगर’मध्ये गुरुवारी (ता.११) प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताची शहर वाहतूक शाखेने दखल घेत पोलीस वाहनचालकाकडून दोनशे रूपये दंड वसूल केला.

बेशिस्त वाहनचालकांमुळे जानेवारी ते मे महिन्यात ४६ दुचाकीचालकांचा मृत्यू झाला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जनजागृती केली जात आहे. वाहतूक नियमांचे सर्वांनी पालन करण्यासाठी शहर पोलिसांतर्फे हेल्मेट सक्तीची कारवाई करण्यात आली. त्यातून वाहतूक शाखा मालामाल झाली. विनाहेल्मेट चालकांवर सलग २१ दिवस कारवाई केल्याने शहरात सकारात्मक बदल झाला आहे. ८० टक्क्यांच्यापुढे दुचाकी वाहनचालक हेल्मेट वापरत असल्याचे दिसत आहे. हेल्मेट सक्तीदरम्यान अनेक वाहनचालकांनी पोलीस कारवाईविरोधात रोष व्यक्त केला. पोलीस फक्त खासगी वाहनांवर कारवाई करतात. पोलीस दल व सरकारी सेवेतील वाहनांना सोडून देतात, कायदे व नियम फक्त सामान्य नागरिकांसाठी असतात, असे अनेक शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनचालक बोलवून दाखवायचे.

- Advertisement -

गुरुवारी शहर वाहतूक शाखेने विरूद्ध दिशेने पोलीस वाहन चालविणार्‍या चालकाकडून दोनशे रूपये दंड वसूल करत कायद्यासमोर असल्याचे दाखवून दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -