Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक पोलिसानेच केले अल्पवयीन मुलीचे अपहरण

पोलिसानेच केले अल्पवयीन मुलीचे अपहरण

नाशिकच्या पंचवटीतील घटना, अपहरण करणार्‍या पोलिसाला अटक

Related Story

- Advertisement -

नाशिकमधील एका पोलीस शिपायाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित पोलिसावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित पोलीस शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे. दीपक जठार असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. दीपक जठार उपनगर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. संबंधित मुलीशी त्याची ओळख असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, अशीही चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. संशयित दीपक हा विवाहित आहे. पंचवटी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला रविवारी (दि.१२) दुपारी घेऊन गेला होता, अशी तक्रार पिडीत मुलीच्या आई-वडिलांनी सोमवारी म्हसरूळ पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नांदूर नाका परिसरातून दोघांना ताब्यात घेतले.

- Advertisement -