घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांचे वेशांतर; सात दरोडेखोर ताब्यात

दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांचे वेशांतर; सात दरोडेखोर ताब्यात

Subscribe

नाशिक : सिन्नर तालुक्यात दरोडा टाकून मारहाण करत दागिने व रोकड लुटणार्‍या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी वेशांतर केले. पोलिसांनी वेशांतर करून सात दरोडेखोरांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी १२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, आठ मोबाईल, पाच दुचाकी असा ९ लाख दोन हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीने नाशिक जिल्ह्यासह बारामती पोलिस ठाण्याच्या हद्दीतही गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. रवींद्र शाहु गोधडे (१९), सोमनाथ बाळू पिंपळे (२०, रा. मनमाड फाटा), करण नंदु पवार (१९, रा. इंदिरानगर, लासलगाव), दीपक तुळशीराम जाधव (रा. चंडीकापूर, ता. दिंडोरी), सुदाम बाळू पिंपळे (रा. राजदेरवाडी, ता. चांदवड), बाळा बाळू पिंपळे व करण उर्फ दादु बाळू पिंपळे (दोघे रा. गुरेवाडी, ता. सिन्नर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेक उपाय करत असतात. असाच एका प्रकरणात एका सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी वेशांतर केले. वेशांतर करून आरोपीवर पाळत ठेवून त्याला जेरबंद केले आणि त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. नांदुरशिंगोटे येथे दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटणार्‍या टोळीतील सात जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या टोळीतील संशयित सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर दरोडा, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्यांनी केलेल्या सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदुरशिंगोटे गावात २४ ऑक्टोबरला दरोडेखोरांनी संतोष गंगाधर कांगणे व रमेश तुकाराम शेळके यांच्या घरात दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत घरातील १३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण सहा लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. वावी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी केल्यानंतर दरोडेखोरांची कपडे, शरीरयष्टी व वर्णनाच्या आधारेे चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथून रवींद्र गोधडे, सोमनाथ पिंपळे, करण नंदु पवार, दीपक तुळशीराम जाधव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी नांदुरशिंगोटे येथे दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यांनी संशयित सुदाम पिंपळे, बाळा पिंपळे व करणू पिंपळे यांच्यासह वावीतील पाथरे येथे घरफोडी, मीरगाव येथे दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे सिन्नर, वाडीवर्‍हे व मनमाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यामुळे तपासी पथकाने सुदाम, बाळा व करण पिंपळे या तिघा संशयितांना सोलापूर तालुक्यातील बाभुळगाव परिसरात दोन दिवस वेशांतर करून पकडले.

ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक सागर शिंपी, मयुर भामरे, वावीचे सहायक निरीक्षक सागर कोते यांच्यासह अंमलदार ज्ञानदेव शिरोळे, रवींद्र वानखेडे, जालिंदर खराटे, नवनाथ सानप, दीपक अहिरे, विनोद टिळे, सुशांत मरकड आदींच्या पथकाने केली. दरोडेखोरांची टोळी पकडणार्‍या पोलीस पथकास पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -