Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक भाजपमधील हाणामारीचा वाद पोलिसांत

भाजपमधील हाणामारीचा वाद पोलिसांत

Subscribe

भाजपच्या अमळनेर मेळाव्यातील हाणामारीचा वाद पोलिसात गेला असून जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या समर्थकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भाजपच्या अमळनेर मेळाव्यातील हाणामारीचा वाद पोलिसात गेला असून जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या समर्थकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मेळाव्यात डॉ. बी. एस. पाटील यांना भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी बेदम मारहाण झाली होती. गुरूवारी (११ एप्रिल) त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे धुळे येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले.

अमळनेर येथे महायुतीच्या मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यात डॉ. पाटील यांना दुखापत झाली असली तरी त्यांनी पहिल्यांदा पोलिसात तक्रार न देण्याचे सूतोवाच केले होते. मात्र, रात्री त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली. यावरून भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि शीतल देशमुख, राजेश वाघ, पंकज पवार, देवा लांडगे, एजाज बागवान व संदीप वाघ या त्यांच्या समर्थकांच्या विरोधात भाग ५, भादंवि कलम १४३, १४७, १४९, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आमदार स्मिता वाघ यादेखील पोलीस स्थानकात दाखल झाल्या असून त्या डॉ. बी.एस. पाटील यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्याची शक्यता आहे. दरम्यान, बेदम मारहाणीमुळे डॉ. बीएस पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना धुळे येथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून लिव्हरला सूज आली आहे. तसेच रक्ताच्या गिठोळ्या तयार झाल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मारहाणप्रकरणी गुन्हे दाखल झाले असून, आता कलमात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -