घरताज्या घडामोडीपोलीस निरीक्षक पांडुरंग खांडवी अपघातात ठार

पोलीस निरीक्षक पांडुरंग खांडवी अपघातात ठार

Subscribe

भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने समोरील वाहनाला दिलेल्या धडकेत पोलीस निरीक्षक पांडुरंग खांडवी (वय ४५) यांचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील रायगड नगर परिसरामध्ये रविवारी (दि.१४) सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान घडली.

पोलीस निरीक्षक पांडुरंग चिंतामण खांडवी यांची नेमणूक मुंब्रा पोलीस ठाणे येथे आहे. ते कारने मूळगावी रोकडपाडा, सालभोये (ता.सुरगाणा, जि.नाशिक) येथून मुंबईकडे जात होते. त्यावेळी ते स्वतः कार (एमएच ०२-डीडब्ल्यू-७०६६) चालवित होते. वाडीवर्‍हे शिवारातील वालदेवी पुलाजवळ त्यांचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. कारने समोरील कार(एमपी ०९-एचएच-३७१७)ला धडक दिली. या अपघातात खांडवी कुटुंबातील पाचजण जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत पोलीस निरीक्षक पांडुरंग चिंतामण खांडवी मृत घोषित केले. याप्रकरणी वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -