घरताज्या घडामोडीघराबाहेर  जायचय; पोलिसांच्या व्हॉट्सअपवर पाठवा ओळखपत्र, रुग्णालयाचे नाव, माहिती 

घराबाहेर  जायचय; पोलिसांच्या व्हॉट्सअपवर पाठवा ओळखपत्र, रुग्णालयाचे नाव, माहिती 

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी करण्यात आली आहे.  अत्यावश्यक सेवेकरिता ज्यांना रुग्णालय किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज आहे, अशा नागरिकांनी त्यांचे नाव, मोबाइल क्रमांक, अडचणीचे स्वरूप,  कुठून कुठे आणि कधी जाणार, स्वतःचे ओळखपत्र आणि ज्या रुग्णालयात जायचे आहे, त्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून पोलीस अधिकाऱ्यांना व्हॉट्सअप  पाठवावी लागणार आहे.

संचारबंदी काळात आरोग्य विभाग, पोलीस, अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू व आपत्ती निवारण व्यस्थापन यांच्याशी निगडित कामासाठी प्रवास करण्यास पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत “कोरोना पोलीस मदत कक्ष” तयार करण्यात आला आहे. नाशिक शहाराअंतर्गत संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवेकरिता ज्या नागरिकांना दवाखाना व त्याच्या अनुषंगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज आहे, अशा नागरिकांनी त्यांचे नाव, मोबाइल क्रमांक, अडचणीचे स्वरूप, कुठून कुठे आणि कधी जाणार, स्वतःचे ओळखपत्र, ज्या रुग्णालयात जायचे आहे, त्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून पोलीस अधिकाऱ्यांना पाठवावी, असे आवाहन पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.

- Advertisement -

संपर्कासाठी व्हॉट्सअप क्रमांक 

7020583176

8485810477

- Advertisement -

7709295534

9373800019

0253 2971233 (औद्योगिक परवानगी करीता)

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -