घरताज्या घडामोडीपोलिसांच्या संचलनात सोशल डिस्टन्सचा फज्जा

पोलिसांच्या संचलनात सोशल डिस्टन्सचा फज्जा

Subscribe

कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. नागरीकांना वारंवार सूचनाही देण्यात येत आहेत. पोलीस दलाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी नवीन नाशिक परिसरातून वाहनाद्वारे पथ संचलन करण्यात आले. मात्र, नागरिकांनी सोशल डिस्टन्स न ठेवता पोलिससांच्या संचलनाचे टाळ्यांच्या कडकडाटासह फुलांच्या वर्षावाने ठिकठिकाणी स्वागत केले. त्यामुुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. संचलनापुर्वी नागरिकांना माहिती दिल्यास ते गर्दी करणार नाहीत, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

प्रभाग क्र.२५ चे नगरसेवक व माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर व माजी प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांनी तसेच सावतानगर येथे श्रीचैतन्य हनुमान मित्र मंडळ, जाजू संकुल मित्र मंडळ, वराडे वारकरी मंडळाच्या वतीने रस्त्यावर सडा रांगोळ्या काढून टाळ-डफाच्या गजरात पुष्पवृष्टी करीत पोलीस दलाचे स्वागत करण्यात आले. संचारबंदीच्या काळात पहिले काही दिवस पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्या, सकाळी फिरणाऱ्यांना काठीचा प्रसाद दिला. नंतर मात्र पोलिसांनी मवाळ भूमिका घेतली होती. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांचीही संख्या वाढू लागली होती. त्यात मंगळवारी पोलिसांनी परीसरातून पायी व वाहनाद्वारे पथ संचलन काढून शक्तिप्रदर्शन केले. तसेच सद्यस्थितीत जमावबंदी, संचारबंदी लागू असून सुरक्षित रहाण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबावे, विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात केले. संचलनात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या संचलनामध्ये अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, चार्ली पथक,वाहन पथक सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -