घरमहाराष्ट्रनाशिकरेल्वे तिकीटाच्या मदतीने उलगडले खुनाचे रहस्य

रेल्वे तिकीटाच्या मदतीने उलगडले खुनाचे रहस्य

Subscribe

पोलिसांच्या पथकाने दोघांना केली अटक, खूनासाठी वापरलेला चाकू हस्तगत

एका रेल्वे तिकीटाच्या मदतीने तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणात दोघांच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली.

शिेदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मयत तरुणाचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून निदर्शनास आले होते. परंतु, ओळख पटत नव्हती. या तरुणाकडे सुरत ते नंदुरबार दरम्यानचे रेल्वेचे तिकीट सापडले होते. तिकीटाच्या आधारावर मयतासह आणखी एकाने प्रवास केल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व सोनगीरचे निरीक्षक पाटील यांनी एक पथक तयार करुन सुरत येथील रेल्वे स्थानकावर पाठवले. तिकीटावरील वेळेनुसार सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास केला. मयत तरुणाचे नाव पवन वाघ असल्याचे स्पष्ट झाले. पवन हा मुळ शिंदखेडा तालुक्यातील रहिवासी असून तो सुरत येथे रहात होता. त्याचा भाउ व अधिकार उर्फ समाधान आनंदसिंग राजपुत व कोमलसिंग ढगेसिंग राजपूत यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याचा वचपा काढण्यासाठी दोघा आरोपींनी पवन याला एका कार्यक्रमाच्या निमीत्ताने शिंदखेडा तालुक्यातील जोगशेलु येथे आणले. त्यानंतर त्याचा धारदार चाकुने खून करुन प्रेत टाकून दिले. या पथकाने दोघांना अटक केली आहे. खूनासाठी वापरलेला चाकू देखील हस्तगत केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -