जीवाची पर्वा न करता महिला पोलीस कर्मचार्‍याने सशस्त्र आरोपीच्या आवळल्या मुसक्या

आयुक्तांकडून दहा हजार रुपये, प्रशस्तीपत्रकाने गौरव

आयुक्तांकडून दहा हजार रुपये, प्रशस्तीपत्रकाने गौरव
आयुक्तांकडून दहा हजार रुपये, प्रशस्तीपत्रकाने गौरव

नाशिक । गंगापूर रोडवरील पाईपलाईन रोडवर एका युवकावर किरकोळ कारणावरून चाकू हल्ला करत दगडाने ठेचून खून झाल्याची घटना बुधवारी (दि.१) सकाळी घडली. या घटने दरम्यानच गंगापूर पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल सरला खैरनार या आपल्या ध्रुवनगर निवासस्थाहून कर्तव्यावर जात असताना त्यांना या खुनाचा आरोपी चाकूसह दिसून आला. त्यांनी जीवाची पर्वा न करता लागलीच प्रसंगवधान दाखवून आरोपीस सशस्त्र ताब्यात घेतले. त्यांना नागरिकांसह सायबर क्राईमचे बंटी सोनवणे यांची मदत झाली. या झटापटीत खैरनारही किरकोळ जखमी झाल्या
पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे व पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय पवार, सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख आदींनी घटनास्थळी धाव घेतली. खैरनार यांचे धाडस पाहता त्यांना पोलीस आयुक्तांनी दहा हजार रुपयांसह प्रशस्तपत्रक देऊन सन्मानित केले.