Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र रात्रगस्त घालणाऱ्या पोलिसांना बिबट्याचं दर्शन

रात्रगस्त घालणाऱ्या पोलिसांना बिबट्याचं दर्शन

पुणे-नाशिक महामार्गावरील एकल घाटातली घटना

Related Story

- Advertisement -

रात्रगस्त घालणाऱ्या (घारगाव, ता. संगमनेर ) येथील पोलिसांना अचानक बिबट्याचं दर्शन घडलं. शुक्रवारी (दि. १०) मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विहिरीच्या काठावर बसलेला बिबट्या अत्यंत शांतपणे जराही न घाबरता रुबाबात निघून गेला.

घारगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावांसह वाड्या-वस्त्यांवर रात्रीची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस कॉन्सटेबल किशोर लाड, चालक संतोष फड, होमगार्ड मोहमद सय्यद हे गुरूवारी रात्री पोलीस गाडीतून गस्त घालत होते. मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास जुन्या माहुली येथील एकल घाटातून जात असताना पोलीस पथकाला रस्त्याकडेला विहिरीच्या कठड्यावर बिबट्या बसलेला दिसला. त्यामुळे बिबट्याला पाहून पोलिसांनी गाडी थांबवली. बराच वेळ गाडीचा हेडलाईट असतानाही बिबट्या त्याच ठिकाणी थांबून होता. काही वेळानंतर हा बिबट्या जराही न घाबरता रुबाबात निघून गेला. पठार भागात जंगली प्राण्यांचा संचार वाढला असल्याने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी निघताना शेतकर्‍यांनी हातात काठी, बॅटरी, सुरक्षेची साधनं घेऊन जावे, असे आवाहन किशोर लाड यांनी केले आहे.

- Advertisement -