घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये साडेतीन लाखांचे चरस जप्त

नाशिकमध्ये साडेतीन लाखांचे चरस जप्त

Subscribe

नासिक-पुणे रोडवरील गंधर्वनगरी मैदानाजवळ गुन्हे शाखा दोनच्या कर्मचार्‍यांनी छापा टाकत साडेतीन लाखाचा चरस हस्तगत केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस तपास करत आहेत.

नासिक-पुणे रोडवरील गंधर्वनगरी मैदानाजवळ गुन्हे शाखा दोनच्या कर्मचार्‍यांनी छापा टाकत साडेतीन लाखाचा चरस हस्तगत केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मार्च रोजी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे रोडवरील मानसी हॉटेल येथील एलआयसी कार्यालयापासून तर शिखरेवाडी मैदान या ठिकाणी संशयित व्यक्ती गांजा  विकण्यासाठी  येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा-२ च्या पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे, राजेंद्र जाधव, देवकिसन गायकर, संजय ताजणे, महेंद्र साळुंखे व दुसर्‍या पथकात पोलीस उपनिरीक्षक संजय सहारे, महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली खांडवी, रमेश वजघजे, मोतीलाल महाजन आदींनी सापळा रचला. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गंधर्व नगरी मैदानापासून, तर एलआयसीकडे येणार्‍या रस्त्यावर गस्त वाढवली गंधर्व नगरी मैदानाकडून येणार्‍या मोपेड गाडीवर असणार्‍या एका इसमाला ताब्यात घेतले. त्याने शंकर मुलचंद छाबरीया (५४, रा. इंदिरा गृहनिर्माण संस्था, दत्त मंदिर चौक, नाशिक रोड) अशी माहिती दिली. तपासणी केली असता त्याच्याकडे साडेतीन लाख रुपयांचा चरस सापडला असून पोलिसांनी तो जप्त केला. यासंदर्भात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास उपनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -