घरमहाराष्ट्रनाशिकमध्यरात्री फिरणार्‍या टवाळखोरांसह मद्यपींना लाठीचा प्रसाद

मध्यरात्री फिरणार्‍या टवाळखोरांसह मद्यपींना लाठीचा प्रसाद

Subscribe

  महिला सुरक्षिततेसाठी पंचवटीसह विविध ठिकाणी पोलिसांची कारवाई

आगामी सुणासुदीचा कालावधी आणि महिलांवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटना या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांनी मध्यरात्री भटकणार्‍या टवाळखोरांना लाठीचा प्रसाद द्यायला सुरुवात केलीय.रात्रीच्या वेळी वर्दळ कमी झाल्यानंतर टवाळखोर रस्त्यावर उपद्रव करत असल्याने पोलिसांच्या निदर्शनास आलंय.

मध्यरात्रीच्या सुमारास निर्जन ठिकाणी, उद्यानांमध्ये अथवा इमारतींखाली अनेक मद्यपी दारू पीत बसलेले असतात. त्यांनाही पोलिसांनी लक्ष्य केलंय.गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या आदेशाने दंगल नियंत्रण पथकाकडून रात्रगस्त सुरू आहे. या कारवाईत गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी बसलेल्या टवाळखोरांना लाठीचा प्रसाद देत पोलिसांनी पिटाळून लावलं. त्यामुळे विनाकारण फिरणार्‍यांनी चांगलीच धास्ती घेतलीय.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -