घरताज्या घडामोडीहॉटेलमध्ये धिंगाणा घालणारा पोलीस निलंबित

हॉटेलमध्ये धिंगाणा घालणारा पोलीस निलंबित

Subscribe

लेखानगरमधील स्पॅक्स बारमध्ये गुंड मित्रांच्या मदतीने व्यवस्थापकास धमकी देत शिवीगाळ व मारहाण करणार्‍या पोलीस सेवकास आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी निलंबन केले आहे. भगवान जाधव असे निलंबित झालेल्या पोलीस सेवकाचे नाव आहे.

शनिवारी (दि.1) लेखानगरमधील स्पॅक्स बारमध्ये पोलीस भगवान जाधव व तडीपारीतून मुक्त झालेला कुप्रसिद्ध गुंड पप्पू कांबळे आले. दोघांनी दारुची बाटली व पाण्याची बाटली व्यवस्थापक भास्कर शेट्टींना मागितली. ती दिल्यानंतर त्यांनी पैशांची मागणी केली असता ‘मी पोलीस कर्मचारी आहे, असे जाधव याने सांगत पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवले. ‘तू मला ओळखत नाहीस का?’ असे म्हणत म्हणत त्याने दमदाटी करत व्यवस्थापकास शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी तक्रारदार अंबड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदण्यासाठी आले असता पोलीस कर्मचार्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. तक्रारदारासोबत आलेल्यांनी पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात संबंधिक पोलिसाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. पोलिसाने हॉटेलमध्ये धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ शहरभर व्हायरल झाला. याप्रकरणी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नांगरे-पाटील यांनी जाधव यास तत्काळ निलंबित करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार मंगळवारी (दि.४) जाधव यास निलंबित करण्यात आले.

पोलीस सेवक जाधव वैद्यकीय रजेवर होते. ते शिस्तबद्ध पोलीस खात्यामध्ये काम करतात. त्यांचे हॉटेलमधील वर्तन बेशिस्तपणाचे असल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी तत्काळ त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन काळात त्यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे.
– पौर्णिमा चौघुले पोलीस उपायुक्त-प्रशासन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -