घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात ३२ सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाई

नाशकात ३२ सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाई

Subscribe

चालू वर्षात एकूण ३२ सराईत गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई

सातपूर पोलीस ठाणे हद्दीत २४ सप्टेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एका बँकेच्या एटीएम केंद्रावर दरोडा टाकल्याची घटना घडली होती. या घटनेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोकड दरोडेखोरांना लांबविता आली नाही. पोलिसांनी पाठलाग करून दोघा संशयित दरोडेखोरांना अटक केली. या दोघांसह त्यांच्या चार साथीदारांविरूध्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मोक्काअन्वये कारवाई केली आहे. चालू वर्षात एकूण ३२ सराईत गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. यापैकी २० गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले आहेत.

दरोड्याच्या गुन्ह्यात गजानन मोतीराम कोळी, मिलनसिंग रामसिंग भादा या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून त्याच रात्री ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. स्मतसिंग रामसिंग भादा (२०), तलवारसिंग जन्नतसिंग भादा (२०),रामसिंग राजुसिंग जुन्नी (२५), आझादसिंग कृपालसिंग भादा (४५, सर्व रा. मोहाडी, जि.धुळे) या संशयितांची नावे दरोड्यात निष्पन्न झाली. या सहा सराईत दरोडेखोरांनी मिळून पालघर, ठाणे, डहाणू जिल्ह्यांत घरफोडी, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे तपासात पुढे आले आहे, अशी माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -
हेही वाचा – पोटच्या गोळ्याला गळफास देत महिलेची आत्महत्या

पोलिसांच्या हाती लागलेला मिलनसिंगविरूध्द १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून गजाननविरूध्द ९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. हे गुन्हेगार सराईत असून संघटितपणे दरोडे, हाणामार्‍या, जबरी लूटसारखे गुन्हे करत असल्याचे तपासात पुढे आल्याने त्यांच्याविरूध्द महाराष्टल संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्याची माहिती नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -