घरमहाराष्ट्रनाशिकआदित्य ठाकरे यांचा शुक्रवारी मनमाडला मेळावा

आदित्य ठाकरे यांचा शुक्रवारी मनमाडला मेळावा

Subscribe

जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांची माहिती

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मनमाडला भेट देऊन शुक्रवारी (१९ जुलै) मेळावा घेणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी दिली. शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सुहास कांदे म्हणाले, नांदगाव मनमाड मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून आजच्या घडीला तालुक्यातील १३५ पैकी ११० ग्रामपंचायती, मनमाड, नांदगाव नगरपालिका, दोन्ही बाजार समित्या, पंचायत समिती यावर शिवसेनेची सत्ता आहे. जिल्हा बँक, फेडरेशन, सोसायट्या यावर देखील शिवसेनेचे वर्चस्व आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती देताना कांदे म्हणाले, वन बूथ ट्वेन्टी युथ ही संकल्पना राबवण्यात सुरवात केली असून एका कार्यकर्त्यांवर तीन कुटुंबापर्यंत पोहचण्याची जबाबदारी दिली आहे. सेनेमार्फत महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहे. सुशिक्षित बेरोजगारासाठी नोकरभरती मेळावा तसेच गोरगरिबांसाठी ठिकठिकाणी मेडिकल कॅम्प घेण्यात येणार आहे. वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते संपर्कात असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे कांदे यांनी सांगितले.

- Advertisement -

करंजवण योजनेबाबत बोलताना कांदे म्हणाले, पुढील महिन्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सेनेचे २२ खासदार हे अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर पेट्रोलियम व रेल्वेमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून योजनेसंदर्भात साकडे घालणार आहे. नांदगाव विधानसभा जागा ही शिवसेनेसाठीच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करून या मतदारसंघातून सेनेचा उमेदवार हमखास विजयी होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -