घरताज्या घडामोडीPolitics : हेमंत गोडसे राहिले बाजूलाच आता या दोन नेत्यांमध्ये नाशिकच्या जागेवरून...

Politics : हेमंत गोडसे राहिले बाजूलाच आता या दोन नेत्यांमध्ये नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच; वाचा सविस्तर

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024च्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. या मतदानासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र महाराष्ट्रात महायुती असो अथवा महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बैठकांचे सत्र सुरू आहे.

नाशिक : लोकसभा निवडणूक 2024च्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. या मतदानासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र महाराष्ट्रात महायुती असो अथवा महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बैठकांचे सत्र सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर आज नाशिक लोकसभा मतदारसंघावरून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज बैठक झाल्याचे समजते. विशेष म्हणजे नाशिकच्या जागेवरून हेमंत गोडसेंचे नाव राहिले बाजूला आता शिवसेना आमदार आणि मंत्री दादा भूसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आले आहे. (Politics Nashik Lok Sabha Constituency Shiv Sena Leader Dada Bhuse Ncp Leader Chhagan Bhujbal Came To Mumbai For Discuss)

लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर सुरूवातीला या जागेसाठी भाजप आक्रमक होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जागेसाठी आक्रमक झाला आहे. पण नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे यंदाही लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. पण अद्याप त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. हेमंत गोडसे हे गेल्या 10 वर्षांपासून नाशिकच्या जागेवर खासदार आहेत. त्यामुळे या जागेवर आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी हेमंत गोडसे हे आग्रही आहेत. विशेष म्हणजे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही गोडसे भेट घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024: शरद पवार गटाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; 40 बड्या नेत्यांचा समावेश

नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत आज बैठकांचे सत्र पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आपला यवतमाळचा दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. तसेच, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ हे देखील मुंबईच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिवसेना पदाधिकारी भाऊ चौधरी यांच्यासह इतर महत्त्वाचे पदाधिकारी हे मुंबईत ठाण मांडून आहेत. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी हेमंत गोडसे प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरुन महायुीतमधील वाद कमालीचे वाढले आहेत. हेमंत गोडसे यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर छगन भुजबळ हे देखील आपली ताकद लावताना दिसत आहेत. नाशिकच्या जागेसाठी मुंबईत खलबतं होत आहेत. त्यामुळे निर्णय नेमका कोणाच्या बाजूने जाणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी घोषित केली होती. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्या या कृतीवर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.


हेही वाचा – SHIVSENA : मुख्यमंत्र्यांनी आता शेतीची अवजारे तयार ठेवावी; ठाकरे गटाचे एकनाथ शिंदेंना टोले आणि चिमटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -