घरमहाराष्ट्रनाशिकगोदावरीच्या प्रदूषणाचा कळस

गोदावरीच्या प्रदूषणाचा कळस

Subscribe

नाशिकमधील मलशुद्धीकरण केंद्रात रासायनिक फेसाला बाजूला काढण्याची शास्त्रशुद्ध यंत्रणाच नसल्याने हा फेस जसाच्या तसा नदीपात्रात मिसळत आहे.

नाशिक केंद्रातून बाहेर पडणार्‍या पाण्यातून प्रदुषणाचा पूर्णत: नायनाट होईल, असा जर कुणाचा समज असेल तर तो साफ चुकीचा ठरेल. कारण नाशिकमधील मलशुद्धीकरण केंद्रात रासायनिक फेसाला बाजूला काढण्याची शास्त्रशुद्ध यंत्रणाच नसल्याने हा फेस जसाच्या तसा नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडची (बीओडी) पातळी १० च्या वर जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या प्रदुषणयुक्त पाण्याचा नागरी आरोग्य, जलचर प्राणी यांसह शेतीवरही विघातक परिणाम होत आहे. या संदर्भातील ‘आपलं महानगर’चा हा विशेष वृत्तांत..

प्रवाहित पाण्यात ‘बीओडी’चे प्रमाण कमीच

बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडची (बीओडी) पातळी नव्या निकषांप्रमाणे १० च्या आत असणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण महामंडळाने वर्षभर केलेल्या पाहणीत ही पातळी १० च्या आत असल्याचे निदर्शनास येते. मात्र, महामंडळाच्या वतीने नेहमी प्रवाहित पाण्याचीच तपासणी केली जाते. प्रत्यक्षात नदी केवळ पाच ते सहा महिने प्रवाहित असते. उर्वरित कालावधीत तिच्यात डबके साचतात. त्या पाण्यातील बीओडीची पातळी अधिक असते. खासगी संस्थेने वा महापालिकेने केलेली पाणी तपासणी बघता नदीपात्रातील बीओडीची पातळी ही २० वा त्यापेक्षा अधिक आढळते.

- Advertisement -

अंंघोळीसाठीही पाणी अयोग्य

टाकळी मलजलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणार्‍या दूषित पाण्यामुळे गोदावरीचे प्राणी प्रदूषित होत असल्याचा अहवाल सिंहस्थापूर्वी निरीने दिला. हे पाणी पिण्यास दूरच, अंघोळीसही योग्य नसल्याचे त्यात म्हटले होते. सिंहस्थात नदीला जोडणारे नाले बंद होते. त्यामुळे पाणी तुलनेने शुद्ध होते. परंतु, त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे.

बीओडी म्हणजे काय?

बायो आक्सिजन डिझॉल्व्ह्ड (बीओडी) म्हणजे पाण्याची गुणवत्ता मोजण्याचा महत्वाचा निकष ठरतो. हा बीओडी म्हणजे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण असते. ते प्रति लीटर मिली ग्रॅममध्ये मोजतात. सूक्ष्म जलचर पाण्यात विरघळलेल्या स्वरुपातील ऑक्सिजनचा वापर करत असतात. कमी प्रमाणातील बीओडी म्हणजे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी, असा निष्कर्ष काढता येतो.

- Advertisement -

या होऊ शकतात उपाययोजना

  • एसटीपीत सिक्वेंसिअल बॅच रिअ‍ॅक्टर तंत्रज्ञानाचा वापर करणे
  • छोट्या कंपन्यांसाठी तातडीने फंफ्ल्युऐंट ट्रिटमेंट प्लांट बांधणे
  • एसटीपीतील पाणी नदीपात्रात न सोडता थेट थर्मल पॉवर स्टेशनपर्यंत पाइपलाइनने नेणे
  • फोयटोराईड प्रकल्पांची ठिकाठिकाणी उभारणी करणे
  • एसटीपीत टर्शरी ट्रिटमेंट होणे गरजेचे.

फेसयुक्त पाण्याने काय परिणाम होतो?

  • त्वचेचे आजार उद्भवतात
  • श्वसनाच्या आजारांतही वाढ होण्याची शक्यता
  • शेतीवर विघातक परिणाम
  • माशांच्या जीवितास धोका
  • नदीपरिसरातील वातावरणातील प्रदूषण पातळीत वाढ

फेसातले घटक : कॉस्टिक सोडा, सोडियम, ऑइल, ग्रीस, नायट्रोजन, फॉस्फेट, फर्टिलायझर.

फेसनिर्मिती का होते?

अनेक छोट्या औद्योगिक वसाहतींतील पाणी थेट नदीपात्रात जाते, मेटल फिनिशर कंपन्यांतील दूषित पाणीही नदीपात्रात जाते. घरगुती सांडपाणीही नदीपात्रात मिसळले जाते. नासर्डी नदीपात्रातील सर्वच पाणी गोदावरीत मिसळते. गोदाघाटावर कपडे धुणे. धोबीघाट आणि लॉण्ड्रींचे पाणी नदीपात्रात सोडले जाते. सर्व्हिस स्टेशनचेही पाणी थेट गोदावरीत सोडले जाते. एसटीपीतील पाणी प्रक्रिया न होताही नदीपात्रात जाते. उंचावरून पाणी आदळल्याने फेस तयार होतो. त्यामुळे पालिकेने पाणी उंचावरून आदळू नये अशी यंत्रणा तपोवन परिसरात तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीही फेस होत आहे. असे होऊ नये म्हणून नदीपात्रात सोफ किंवा डिटर्जंटचे घटक मिसळूच नये याची काळजी घेणे गरजेचे असताना महापालिका मात्र अनावश्यक बाबींकडेच अधिक गांभीर्याने लक्ष देत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -