घरमहाराष्ट्रनाशिकखड्डयांमुळे नाशिक-कसारा महामार्ग बनला मृत्युचा सापळा

खड्डयांमुळे नाशिक-कसारा महामार्ग बनला मृत्युचा सापळा

Subscribe

महिनाभरात रस्ते दुरूस्त न केल्यास कारवाई : खा.गोडसे

नाशिक ते कसारा दरम्यानच्या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी शनिवारी या महामार्गाची पाहणी करत ९९ किलोमीटरचा रस्ता महिनाअखेर पर्यन्त दुरुस्त झालाच पाहिजे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा गर्भीत इशारा दिला.

नाशिक ते कसारा या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाची गेल्या काही महिन्यांपासून मोठ्याप्रमाणात दुरवस्था झालेली आहे. महामार्गावर मोठमोठी खड्डे पडली असून अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबराचा थर पुर्णत: निघून गेलेला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे काही किलोमीटर अंतरावरील रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली आहे.

- Advertisement -

अनेक ठिकाणी महामार्गाला असणार्‍या साईडपट्ट्या आणि कॅटआई नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. खा. गोडसे यांनी नॅशनल हायवेच्या आणि टोल प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष दुरावस्था झालेल्या गोंदे फाटा, मुढेंगाव फाटा, भंडारदरा फाटा, घोटी, भावली फाटा, घोटी वाहतूक टॅप, इगतपुरी, हॉटेल मानस, कसारा घाट या ठिकाणी घेवून जात महामार्गाची पाहणी केली.यावेळी त्यांनी महामार्गाच्या अधिकारयांना रस्त्याच्या कामावरून खडेबोल सुनावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -