घरताज्या घडामोडीमालेगाव @ 325; रुग्णसंख्येत 27 पॉझिटिव्हची भर

मालेगाव @ 325; रुग्णसंख्येत 27 पॉझिटिव्हची भर

Subscribe
 मालेगावात कोरोनाचे थैमान सुरूच असून, रविवारी (दि.3) जिल्हा प्रशासनास मालेगावातील 128 संशयित रुग्णांचे रिपोर्ट मिळाले आहेत. त्यातील 37 रिपोर्ट पॉझिटिव्ह असून उर्वरित 101 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. 37 रुग्णांमधील 10 रुग्णांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आले असून 27 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेक्षण अधिकारी, पोलीस, एसआरपीएफ जवानांचा समावेश आहे. मालेगावात 325 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर नाशिक जिल्ह्यात 360 रुग्ण कोरोनाबाधित आहेत.
      कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहेत. मालेगावात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, असे आवाहन पोलीस वारंवार करत आहेत. तरीही, मालेगावात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी प्रशासनास 128 रिपोर्ट मिळाले असून 27 नवे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यातील एकजण
मालेगावात काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या जागतिक आरोग्य संघटने(डब्ल्यूएचओ)च्या सर्व्हेक्षण अधिकारी आहे. मालेगावात कोरोनाचा प्रसार, प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आदींचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य संघटनेतर्फे सर्व्हेक्षण अधिकारी विविध भागात सर्व्हे करत आहेत. त्या ठिकाणी जाताना ते सर्वोतोपरी खबरदारी घेत असताना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
नाशिक कोरोना अहवाल 
पॉझिटिव्ह रुग्ण 360 
मालेगाव 325 बरे 20, मृत 12
नाशिक शहर 16 बरे 3
नाशिक ग्रामीण 17 बरे 2
परजिल्ह्यातील 3
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -