घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रउत्तर महाराष्ट्राला हवामान विभागाचा यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्राला हवामान विभागाचा यलो अलर्ट

Subscribe

पुढील तीन दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता

सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीय वार्‍याची स्थिती निर्माण होत असून, ही गती आठवडाभरात आणखी तीव्र होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय. या परिस्थितीमुळे नाशिकसह महाराष्ट्रात 2३ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपासनं नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतली होती. बाप्पांच्या विसर्जनानंतर आज दुपारी पुन्हा एकदा रिमझिम पाऊस झाला. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तिन्ही दिवशी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. मंगळवार आणि बुधवारी अर्थात २१ आणि 22 सप्टेंबरला अनेक ठिकाणी वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. या काळात धुकं असण्याचीही शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -