खेडला वादळी वार्‍याने कोसळले पोल्ट्री शेड

शेतकर्‍याचे १२ लाखांचे नुकसान

aswali station

 इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव येथील शेतकरी, पोल्ट्री व्यवसायिक चंद्रकांत किसन वाजे यांचे पोल्ट्री शेड रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वारा व पाऊस झाल्याने कोसळले. यावेळी पोल्ट्रीची देखरेख करणारा चंद्रकांत वाजे यांचा भांचा प्रसंगवधान दाखवत बाहेर पडल्याने तो बचावला.

शेतकरी चंद्रकांत वाजे यांनी दोन ते अडीच वर्षांपूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून त्यांच्या मळ्यात पोल्ट्री शेड बांधले होते. त्यामध्ये तीन हजार ब्रॉयलर कोंबड्या होत्या. या कोंबड्या दोन ते तीन दिवसात बाजारात विकण्यासाठी पाठवणार होते. मात्र वादळी वार्‍याने भिंती व पत्रे कोंबड्याiवर कोसळल्याने 2500 कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. पोल्ट्री शेड जमीनदोस्त झाल्याने यातील पक्ष्यांना खाद्य देण्यात येणारे साहित्य, पाईपलाइन, लोखंडी जाळी, पक्षी खाद्य, ताडपत्रीचे पूर्णतः नुकसान झाल्याने एकूण शेडसह जवळपास १२ ते १३ लाखांचे नुकसान झाल्याचे वाजे यांचे म्हणणे आहे. शासनाने याची दखल घेत पोल्ट्री व्यावसायिकाला मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.