पारंपरिक पध्दतीबरोबर विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख प्रात्यक्षिक शिक्षण देणे गरजेचे – मणेरीकर

चौदाव्या जागतीक शैक्षणिक परीषदेत सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी मांडले आपले शैक्षणीक विचार

केंद्रीय शिक्षण मंत्रालय, दुबई, बहारीण, आणि ऑल इंडीया कौन्सील ऑफ टेक्नीकल एज्युकेशन (एआयसीटीई) आयोजीत एलीटस् चौदाव्या जागतीक शिक्षण परीषदेची नुकतीच दोन दिवसीय जागतीक स्तरावरील परिसंवाद संपन्न झाला. या परिसंवादेत ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या संचालीका सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना पुस्तक, पाटी, खडू, फळा आणि पारंपरिक पध्दतीचे वर्गातील शिक्षण क्षेत्रात काय नाविन्यपुर्ण कृतीशील उपक्रम राबवता येतात ज्यायोगे प्रगल्भ, जबाबदार, सृजनशील नागरीक घडवू शकतो. हा विषय देण्यात आला होता.

हि परिषद नवी दिल्ली येथे हॉटेल दि लीला अम्बीयन्स कन्व्हेशन येथे संपन्न झाली. सौ. मणेरीकर यांना दिलेल्या विषयावर आपले विचार मांडतांना सांगितले की, ‘‘शाळेतील पारंपरिक पध्दतीबरोबर विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख प्रात्याक्षिक शिक्षण दिले पाहिजे. विद्यार्थ्यांवर विविध सामाजिक, वैज्ञानिक, सकारात्मक प्रयोगशील उपक्रम राबवून त्यांच्यातील विकास सातत्याने घडवून आणला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पारंपरिक, शैक्षणिक पध्दतीचा समतोल मिलाफ करुन शैक्षणिक उपक्रम राबविले पाहिजे.’’ या विषयावर विचार मांडताना पॅनेल मध्ये इराण, इराक, चायना, जम्मू आणि काश्मीर, नोयडा, बंगलोर येथील शिक्षण तज्ञ मंचावर उपस्थित होते.

या परिषदेत आयोजकांतर्फे सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर यांना आसाम सरकारच्या ए.एच.एस.ई.सी.चे सचिव कमल ज्योती गोगोई आणि मणिपूर सरकारचे शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. चीथुंग मॅरी थॉमस यांच्या हस्ते यावर्षीच्या ‘हेड टिचर ऑफ दि इयर इन अ सेकंडरी स्कूल’ या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच शाळेचे सहशिक्षक श्री. मेहराज शेख यांना देखील ‘एक्सलेन्स इन इन्स्ट्रक्शनल लीडरशीप’ या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या जागतिक शिक्षण परिषदेत संपूर्ण भारतातून प्रतिष्ठित शासकीय शिक्षण संस्थांचे शासकीय अधिकारी आणि दिग्गज शिक्षणतज्ञ सहभागी झाले होते. भारता बाहेरून देखील दुबई, इराक, इराण, चायना, यु ए इ, युके, दोहा, कतार, तर देशातील विविध राज्यांचे शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभागांचे सचिव आणि सर्वच राज्यातील शिक्षण तज्ञ सहभागी झाले होते.

या जागतिक शिक्षण परिषदेचे प्रमुख उद्दिष्टः

  •  भारतातील शिक्षण अवस्था बदलण्यासाठी अथवा त्यात सुधारणा करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील अनेक नामांकित शाळांचे, महाविद्यालयांचे प्रमुख आपापल्या स्तरावर काय प्रयत्न करत आहेत?
  • त्यांनी कोणते आधुनिक आणि प्रायोगिक उपक्रम राबवले आहेत? तसेच त्यांच्या या प्रयोगांची, पुढारलेल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, दखल घेतली जावी, त्या प्रयोगांचा प्रसार व्हावा आणि एकुणच शिक्षण जागृती व्हावी या दृष्टीने ही जागतिक शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.
  • पुर्व प्राथमिक विभागापासून उच्च महाविद्यालयीन तसेच तंत्रशिक्षण संचालनालया पर्यंत सर्वच नामांकित मध्यवर्ती आणि काश्मीर ते त्रिवेंद्रम भारतातील सर्वच राज्यातील शिक्षण संस्थांचा समावेश होता.