श्री जैन ओसवाल बोर्डिंगच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचा दमदार विजय

चैतन्य पॅनलचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व उमेदवारांना मतदारांचा मिळाला कौल

जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी आधारवड बनलेल्या श्री जैन ओसवाल बोर्डिंगच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या प्रगती पॅनलने विरोधी चैतन्य पॅनलचा पुरता धुव्वा उडवत दमदार विजय मिळवला. प्रगतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी कौल देत प्रगतीसाठी पाठबळ दिलं.

श्री जैन ओसवाल बोर्डिंगच्या प्रबंध समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती आणि चैतन्य हे दोन्हीही पॅनल आमने-सामने उभे ठाकले होते. विश्वस्त पदासाठी झालेल्या या निवडणुकीत दोन्हीही पॅनलच्या १०-१० अशा २० उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. विशेष म्हणजे यंदा प्रथमच उच्चांकी सुमारे ७० टक्के मतदान झाले. त्यामुळे धक्कादायक निकालाचे संकेत होते. एकूणच सुुरुवातीपासूनच ही निवडणूक वादविवादांमुळे चर्चेत होती. तुल्यबळ प्रस्थापित विरुद्ध दावेदारी करणारे असे दोन्हीही पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र, मतदारांनी आश्वासन आणि आरोपांकडे लक्ष न देता थेट प्रत्यक्ष दिसणारी प्रगती, सुरू असलेली कामं यावर विश्वास ठेवत मतदान केलं.

प्रगती पॅनलच्या उमेदवारांना मिळालेली मतं अशी..

  • शशिकांत पारख – १३३९
  • विनोद बेदमुथा – १३०२
  • अशोक साखला – १२९३
  • सोहनलाल भंडारी – १२३२
  • सुनील बुरड – १२१४
  • रवींद्र पारख – ११७९
  • नवीन बंब – १०९३
  • डॉ. दिलीप खिंवसरा – १०८२
  • सुनील भटेवरा – १०४४
  • विजय टाटिया – ९९५