घरमहाराष्ट्रनाशिक'नामको'त प्रगती पॅनल विजयाच्या उंबरठ्यावर

‘नामको’त प्रगती पॅनल विजयाच्या उंबरठ्यावर

Subscribe

२१ जागांसाठी तीन प्रमुख पॅनल व्यतिरिक्त अपक्ष मिळून एकूण ८२ उमेदवार या निवडणूक रिंगणात असल्यामुळे मतपत्रिका मोठी होती.

नाशिक : व्यापारी वर्गातील प्रतिष्ठा लाभलेल्या नाशिक मर्चन्टस्‌ सहकारी (नामको) बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार वसंत गिते, सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनल विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

नवीन नाशिक येथील राजे संभाजी स्टेडियम येथे बुधवारी (दि. २६) सकाळी ८ वा. मतमोजणीस प्रारंभ झाला. २१ जागांसाठी ८२ उमेदवार या निवडणूक रिंगणात असल्यामुळे मतपत्रिका अयिंत क्लिष्ट व विस्तृत असल्यामुळे मतमोजणीस विलंब झाला. दिवसभरात मतमोजणीची एकच फेरी पार पडली. यात प्रगती पॅनलचे सर्वसाधारण गटातील १७ उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून आले. तसेच महिला गटातील दोन जागांसाठी प्रगतीच आघाडीवर आहे. सायंकाळी दुसर्‍या फेरीतील मतमोजणीस प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत या फेरीची मतमोजणी सुरु राहणार आहे.

- Advertisement -

पहिल्या फेरी अखेर मिळालेली मते : वसंत गिते ८३९५, हेमंत धात्रक ७५८४, विजय साने ७२४४, नरेंद्र पवार ७०६२, सोहनलाल भंडारी ६९९५, प्रफुल्ल संचेती ६९४४, कांतीलाल जैन ६५८०, हरिष लोढा ६५७४, गजानन शेलार ६५६२, अविनाश गोठी ६५४४, रंजन ठाकरे ६५१०, प्रकाश दायमा ६४३०, सुभाष नहार ६३२७, शिवदास डागा ६३०५, अशोक सोनजे ६१९९, भानुदास चौधरी ५९९१, गणेश गिते ५९६९, महेंद्र बुरड ५८०१, शोभा छाजेड ८९१८, रजनी जातेगावकर ८३९८, प्रशांत दिवे ६९२८

बाद मतांचा होणार विक्रम

२१ जागांसाठी तीन प्रमुख पॅनल व्यतिरिक्त अपक्ष मिळून एकूण ८२ उमेदवार या निवडणूक रिंगणात असल्यामुळे मतपत्रिका मोठी होती. त्यामुळे मतदारांचा एकच गोंधळ उडाल्याचे मतमोजणीतून समोर आले आहे. या निवडणूकीत बाद मतांचा विक्रम नोंदविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -