घरताज्या घडामोडीकरोनामुक्तीसाठी प्रकाशचंद्र लोहाडे यांचे सव्वालाख जप

करोनामुक्तीसाठी प्रकाशचंद्र लोहाडे यांचे सव्वालाख जप

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात घेतला विश्वशांतीचा ध्यास; दररोज जपतात 100 माळा

नाशिक : संपुर्ण जग करोना मुक्तीसाठी अविश्रांत प्रयत्नशिल असताना नाशिकमधील 72 वर्षीय प्रकाशचंद्र लोहाडे यांनी लॉकडाऊनच्या काळात सव्वालाख जप करत विश्वशांतीचा संदेश दिला आहे. प. पू. गणिनी आर्यिका ज्ञानमती माताजी यांच्या प्रेरणेतून दि. 22 मार्चपासून त्यांनी विश्वशांती जप सुरु केले होते. देशात मोठ्या प्रमाणात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. जगातील बहुतेक देशांमध्ये विदारक स्थिती निर्माण झालेली असल्याने मानवी जीवांना धोका निर्माण झाल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर विश्वशांती प्रस्थापित होण्याची आवश्यकता असल्याने त्यासाठी प. पू. गणिनी आर्यिका ज्ञानमती माताजी यांच्याकडून भगवान महावीरांची प्रार्थना करण्याची प्रेरणा घेत प्रकाशचंद्र लोहाडे यांनी सव्वालाख जप सुरु केले. 108 मन्यांची माळ दिवसातून शंभर वेळ ते जपतात. अशोक स्तभ येथील रहिवासी असलेले प्रकाशचंद्र लोहाडे हे दिवसातून एक वेळा भोजन करतात. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर न पडण्याची प्रतिज्ञाही त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे भगवान महावीर यांच्या जयंतीच्या दिवशीही त्यांनी आपली प्रतिज्ञा मोडली नाही. अखंड जप करत त्यांनी 14 एप्रिल रोजी सव्वालाख जप पूर्ण करत देशाला, जगाल करोना मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -