घर महाराष्ट्र नाशिक प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक कुंभमेळ्यासाठी तयारी, भव्यता देण्याचा प्रयत्न

प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक कुंभमेळ्यासाठी तयारी, भव्यता देण्याचा प्रयत्न

Subscribe

नाशिक : नाशिक येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तयारी सुरू केली आहे. कुंभमेळयापूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे २०२५ मध्ये कुंभमेळा होणार आहे. प्रयागराजमध्ये करण्यात येणार्‍या उपाययोजनांचा अभ्यास करून त्या धर्तीवर नाशिक कुंभमेळ्यासाठी नियोजन करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेच्या सिहंस्थ नियोजन बैठकीत घेण्यात आला.

सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारीसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळयाचे आयोजन होते. या काळात शाही स्नानाची पर्वणी असते. संपूर्ण देशभरातून तसेच परदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये येत असतात. त्यामुळे प्रशासनाकडून भाविकांच्या सोयी सुविधांसाठी मोठे नियोजन केले जाते. २००३ आणि २०१५ मध्ये कशा प्रकारे नियोजन केले होते. याविषयी सोमवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

प्रयागरागमध्ये २०२५ मध्ये होणार्‍या कुंभमेळयासाठी कशा प्रकारे नियोजन करण्यात येत आहे. याचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेचे एक पथक पाठविण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर नाशिकमधील गोदाघाटाचा विकास केला जाणार आहे. त्यात घाट विकास, प्रदुषणमुक्त गोदावरी, मलनिस्सारण केंद्राचे सक्षमीकरण केले जाणार आहे. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आराखडा समन्वय समिती गठीत करण्यात येणार आहे. आराखडा तयार करण्याचे काम समितीकडे सुरू आहे. हा आराखडा राज्य व केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त विजयकुमार मुंडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, संदेश शिंदे, सचिन जाधव, जितेंद्र पाटोळे, मलनिस्सारण केंद्रोच अधिक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, गणेश मैंद, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता रविंद्र धारणकर, अविनाश धनाईत, बाजीराव माळी, मिळकत विभाग व्यवस्थापक जयवंत राउत, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, घनकचरा व्यवस्थापक कल्पना कुटे उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -