घरमहाराष्ट्रनाशिकबजेट कोलमडलं : सिलेंडर साठी मोजावे लागणार आत्त्ता तब्ब्ल ८८८ रुपये

बजेट कोलमडलं : सिलेंडर साठी मोजावे लागणार आत्त्ता तब्ब्ल ८८८ रुपये

Subscribe

आठ महिन्यांत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर तब्बल 190 रुपयांनी वाढलेत.

पेट्रोलने शंभरी पार केलेली असतांना गॅस दराने हजाराच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पंधरा दिवसांत ५० रूपयांनी दर वाढल्याने महिलांचे किचनचे बजेट कोलमडले आहे. नाशिकमध्ये गॅसचे दर ८८८.५० रूपये झाले आहेत.कोरोनाच्या संकटाने सामान्यांचे जगणे हैराण केले आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या टाळेबंदीने अनेकांच्या हातचे रोजगार हिरावले गेले. हजारो कुटुंब आर्थिक संकटाच्या खाईत लोटली गेली.

आता पुन्हा तिसर्‍या लाटेची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का, याची धास्ती अनेकांना आहे. अशातच पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाच्या वाढलेल्या दराने सामान्यांना हैराण केले आहे. त्यातच १ सप्टेंबरपासून स्वयंपाकाच्या गॅसचे दर महागल्याने सामान्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. या वर्षी 1 जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजे आठ महिन्यांत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर तब्बल 190 रुपयांनी वाढलेत. विशेष म्हणजे 1 मार्च 2014 पासून तब्बल 478 रुपयांची ही वाढ झाली. 1 मार्च 2014 रोजी हे दर 410 रुपये 50 पैसे होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -