घरमहाराष्ट्रनाशिकमहंत सुधीर पुजारी यांना दुबईत अटक

महंत सुधीर पुजारी यांना दुबईत अटक

Subscribe

श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत पुजारी यांच्या दुबईत वेगवेगळ्या नावाने तीन कंपन्या, शाही घराण्याच्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी अटक व जामीनावर सुटका

नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीर पुजारी यांना शाही घराण्याच्या नावाचा वैयक्तिक स्वार्थासाठी गैरवापर केल्याप्रकरणी सोमवारी, ११ मार्चला दुबईत अटक करण्यात आली. भारतीय अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर महंत पुजारी यांची जामीनावर सुटका करण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क असलेल्या महंत सुधीर पुजारी यांनी दुबईत वेगवेगळ्या नावाने तीन कंपन्या स्थापन केल्या आहेत. शाही घराण्यातील सदस्यांच्या तक्रारीवरुन दुबई पोलिसांनी त्यांना अटक केली. आर्थिक कमाई आणि संपत्तीसाठी शाही घराण्याच्या नावाचा महंत पुजारी यांनी गैरवापर केल्याची तक्रार आहे. महंत पुजारी यांना जामीनावर सोडण्यात आले असले तरीही त्यांचा पासपोर्ट पोलिसांच्याच ताब्यात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -