घरमहाराष्ट्रनाशिकराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविरोधात प्राथमिक शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविरोधात प्राथमिक शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा

Subscribe

राज्य सरकारनं हे धोरण स्विकारताना प्राथमिक विभागाकडे पहिली ते पाचवीच्या तुकड्या वर्ग करण्याची तयारी केलीय. तसं झालं तर आपण अतिरिक्त ठरू, अशी भिती शिक्षकांना सतावतेय.

केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे अतिरिक्त ठरण्याच्या धास्तीने शिक्षकांनी या धोरणाला थेट विरोध करत आंदोलनाचा इशारा दिलाय. केंद्र सरकारनं २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासनं नव्या धोरणाच्या अमलबजावणीचा निर्णय घेतलाय. मात्र, राज्य सरकारनं हे धोरण स्विकारताना प्राथमिक विभागाकडे पहिली ते पाचवीच्या तुकड्या वर्ग करण्याची तयारी केलीय. तसं झालं तर आपण अतिरिक्त ठरू, अशी भिती शिक्षकांना सतावतेय. याशिवाय शिक्षकेतर कर्मचार्‍यांचं काय होणार असा सवालही उपस्थित होतोय. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षकांनी या धोरणाला विरोध सुरू केलाय. तर, दुसरीकडे नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने चांगलं असल्याचं सांगत काही शिक्षक संघटनांनी या धोरणाला पाठिंबा दिलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -