घरमहाराष्ट्रनाशिकपंतप्रधान मोदी, फडणवीस, पवार, ठाकरेंच्या धडाडणार तोफा

पंतप्रधान मोदी, फडणवीस, पवार, ठाकरेंच्या धडाडणार तोफा

Subscribe

नाशिक निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून उमेदवारांनी यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला असून या आखाडयात पुढील आठवड्यापासून राष्ट्रीय आणि राज्य तळीवरील नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत.

नाशिक निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून उमेदवारांनी यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला असून या आखाडयात पुढील आठवड्यापासून राष्ट्रीय आणि राज्य तळीवरील नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. यंदाची निवडणूक मोदी विरुद्ध सर्व पक्ष अशी होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आता स्वतः प्रचारात उतरले आहेत. मोदींची नाशिकमध्येही सभा होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचे नियोजन करण्यात येत आहे. आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेतेमंडळींच्या तोफा धडाडणार आहेत.

जिल्ह्यातील दोन लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी १२ एप्रिलपर्यंत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत स्थानिक नेत्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ, भाजप – सेना युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी व्यक्तिगत भेटीगाठीतून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहेत. अर्ज भरण्यापूर्वी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यापुढील काळात या फैरी आणखी तीव्र होणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय व राज्यपातळीवरील नेत्यांचा समावेश होणार आहे. अशा दिग्गज नेत्यांच्या सभा मतदारसंघात होण्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या सभांचे नियोजन केले जात आहे. त्याचप्रमाणे ‘माकप’तर्फेही प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

रविवारी आदित्य संवाद

शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा नाशिकमध्ये ‘रोड शो’ चे आयोजन करण्यात आले असून आदित्य संवाद या कार्यक्रमाद्वारे ते युवकांशी संवाद साधणार आहेत. ठाकरे यांच्या ‘रोड शो’द्वारे नवमतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

मोदींची पिंपळगावला सभा

दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार उमेदवारी करत असून त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडोरी, धुळे आणि नाशिक या तीन मतदारसंघाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून पिंपळगाव येथे सभेचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु दिंडोरी येथेही सभेच्या जागेची चाचपणी सुरू असल्याचे समजते. अद्याप या सभेचे ठिकाण आणि तारीख निश्चित झालेली नसली तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १७ एप्रिलला ही सभा आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

- Advertisement -

भुजबळ, मुंडे, कोल्हेच्या सभांना मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाध्यक्ष शरद पवारांसह माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, अभिनेते अमोल कोल्हे यांच्या सभांचे नियोजन केले जात आहे. रोखठोक भाषणासाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार, छगन भुजबळ यांच्याही सभांचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संयुक्त सभेचेही नियोजन करण्यात येत आहे.

महायुतीचा शुक्रवारी महामेळावा

शिवसेना भाजप युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री गिरीश महाजन, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. ५) महायुतीच्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या मैदानात स्वतः आमदार छगन भुजबळ यांनी तळ ठोकल्याने आता भुजबळांचा सामना करण्यासाठी महायुतीनेही संयुक्त मेळाव्यांचे आयोजन करत शहरी भागाकडेही लक्ष केंद्रित केले आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींविरोधात प्रचार करा, असे आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिले असले तरी कोणाचा प्रचार करावा याबाबत स्पष्ट केलेले नाही. गुढीपाडव्यानिमित्त होणार्‍या मनसेच्या मेळाव्यात ते भूमिका जाहीर करणार आहेत. नाशिकमध्ये मनसे पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना पाठिंबा दर्शवत प्रत्यक्ष प्रचारातही सहभागी घेतल्याचे दिसून येते. नाशिकमध्ये आघाडीच्या व्यासपीठावर राज ठाकरे यांना आमंत्रित करावयाच्या हालचालीही वरिष्ठांकडून सुरू असल्याचे समजते.

सीताराम येचुरींची आज सभा

माकपाचे आमदार जीवा पांडू गावित यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून दंड थोपटले असून गुरूवारी ४ ला माकपाचे महासचिव सीताराम येचुरी यांची चांदवड बाजारतळ येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सुरगाणा पेठ तालुक्यातून पश्चिमेला वाहून जाणारे पाणी येथील दुष्काळी भागाला मिळावे. तसेच आदिवासींच्या वनहक्कांबाबतची प्रकरणे निकाली काढावीत या मुद्यावर गावित यांनी लढा उभारला आहे. त्यामुळे हेच मुद्द गावितांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -