घर उत्तर महाराष्ट्र प्राईम प्रॉपर्टी, भाडे केवळ ३ हजार; नाशिक बाजार समितीचा प्रताप

प्राईम प्रॉपर्टी, भाडे केवळ ३ हजार; नाशिक बाजार समितीचा प्रताप

Subscribe

नाशिक : त्र्यंबकमधील स्वमालकीची जागा नाशिक बाजार समितीने अवघ्या तीन हजार भाडेतत्वावर दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जागा भाड्याने देताना बाजार समितीत कोणताही ठराव झाला नसून, सभापतींनी स्वतःच्या विशेष अधिकारात मर्जीतील एका संचालकाच्या मुलाला ही जागा दिल्याचे समोर आले आहे. जागेचा करार प्रत्यक्षात वेगळ्याच व्यक्तीच्या नावाने असून, या जागेवरील पार्किंगच्या आडून श्रावणातील गर्दी कॅश करण्याचा मोठा उद्योग सुरू असल्याचे बोलले जात आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स असून, वाहनांच्या पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध आहे. मात्र, त्याचा अद्याप वापर होत नसल्याचा फायदा घेत बाजार समितीच्या एका संचालकाच्या मुलाने दुसर्‍याच्या नावे ही जागा भाडेतत्वावर घेतली आहे. या जागेचे भाडे अवघे तीन हजार ठरले असून, संचालकाच्या मुलाच्या खिशात मात्र भरभक्कम रक्कम जात असल्याची चर्चा आहे. या व्यवहारात बाजार समितीचे मोठे नुकसान होत असताना, सभापतींनी त्यांच्या विशेष अधिकारात परवानगी दिल्याने हा मुद्दा बाजार समितीत वादग्रस्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त परराज्यातून येणार्‍या भाविकांची संख्या मोठी असून, प्रत्येक गाडीच्या मागे दोनशे ते तीनशे रुपये आकारले जात आहेत. वास्तविक बाजार समितीच्या मालकीच्या भूखंडांबाबत निर्णय घेताना संचालकांचा ठराव करणे गरजेचे असताना सभापतींनी या औपचारिकतेला बगल देत थेट निर्णय घेतल्याने यातील संशय आणखीनच वाढला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीची त्र्यंबकेश्वर येथील जागा निवृत्ती संतू पोटिंदे व पांडुरंग भिका आचारी यांना एक महिना कालावधीसाठी वापरण्यास देण्यात आली आहे. त्यामोबदल्यात बाजार समितीला तीन हजार रुपये भाडे मिळणार असून, याबाबत बाजार समितीत कोणताही ठराव झालेला नाही. सभापतींनी त्यांच्या विशेष अधिकारात निर्णय घेतला आहे. : अरुण काळे, सचिव, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -