घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगाडीला जीपीएस लावण्यावरून झालेल्या वादात प्रियसी व तिच्या मुलीवर केले वार

गाडीला जीपीएस लावण्यावरून झालेल्या वादात प्रियसी व तिच्या मुलीवर केले वार

Subscribe

नाशिक : लिव्ह इन रिलेशन मध्ये राहणार्‍या युवकाने महिलेच्या दुचाकीत जीपीएस बसविल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून महिला व तिच्या १६ वर्षीय मुलीवर धारदार शस्राने सपासप वार केले. त्यानंतर युवकाने स्वतःवरही वार केले. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंद्रिय विद्यालयासमोर शुक्रवारी (दि.१७) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात आणि युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सरजीत झंझोटे (डिगीया) असे युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलरोड भागातील आदर्श नगर येथे राहणार्‍या महिलेचा पहिल्या पतीबरोबर घटस्फोट झाला. त्यानंतर सिव्हिल रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील कामगार सरजित झांजोटे याचे सोबत अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. शुक्रवारी (दि.१७) दुपारी महिलेची दुचाकी वारंवार बंद पडत असल्याने दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये लावली. त्यावेळी त्यांना गाडीत लावलेले जीपीएस असल्याचे समजले. त्यानंतर महिलेने सरजित याला उपनगर पोलीस ठाणे परिसरात बोलावून घेत विचारणा केली. त्यातून वाद होऊन सरजित याने महिलेवर धारदार शस्राने वार केले. तिच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी आईला सोडविण्यासाठी पुढे आली असता सरजितने तिच्या डोक्यावर वार केले. त्यात दोघी गंभीर जखमी झाल्या. शेवटी सरजितने स्वतःच्या पोटावर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून महिलेला नाशिकरोड येथील खासगी हॉस्पिटमध्ये दाखल केले आणि तिच्या मुलीला बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर सरजीत झंझोटे यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सरजित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -
पोलिसांचा वचक आहे की नाही ?

नाशिकरोड परिसरात हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नाशिकरोडवरील केंद्रिय विद्यालय हे उपनगर पोलीस ठाण्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर आहे. तरीही, युवकाने पोलिसांचे भय न बाळगता मायलेकीवर हल्ला केला. लोखंडे मळा परिसरात एका सराफाने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. सावकाराच्या जाचाला कंटाळून दोन भावंडांनी विषप्राशन केले. त्यात एकाच मृत्यू झाला. कारचे हफ्ते भरण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याने भरचौकात चाकू करण्यात आला होता. या घटनांमुळे शहरात खाकीचा धाक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हल्लेखोराचा महिलेवर संशय

पीडित महिला जिल्हा रुग्णालयात काही वर्ष काम करत होती. त्यावेळी दोघांची ओळख झाली होती. तेंव्हापासून दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहेत. सरजित महिलेवर कायम संशय घ्यायचा. त्यातून त्यांच्यात वाद व्हायचे. सरजितने तिच्या दुचाकीत जीपीएस लावलेले आढळल्याने दोघांमधील वाद विकोपाला गेला. तिने जीपीएस सिस्टमबाबत पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -