Eco friendly bappa Competition
घर गणेशोत्सव 2022 'सेल्फी विथ बाप्पा' स्पर्धेचे बक्षिस वितरण

‘सेल्फी विथ बाप्पा’ स्पर्धेचे बक्षिस वितरण

Subscribe

नाशिक : दैनिक ‘आपलं महानगर’, माय महानगर डॉट कॉम आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक, पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ बाप्पा’ स्पर्धेतील विजेत्यांचा मंगळवारी (दि.११) आपलं महानगरच्या कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आलीत. स्मृतीचिन्ह आणि आरोग्यदायी भेट असे बक्षिसाचे स्वरुप आहे.

स्पर्धेला गणेश भक्तांचा भरभरुन प्रतिसाद लाभला. ‘आपलं महानगर’चे निवासी संपादक हेमंत भोसले, लायन्सचे माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव व लायन्स क्लब ऑफ पंचवटीचे अध्यक्ष प्रशांत सोनजे, यांच्या हस्ते विजेते स्वप्निल कराड, गोपाल भडांगे, स्नेहल शुभम सातपुते, वरद विशाल राऊत, पल्लवी ओढेकर व अमोल ओढेकर, अमेय राहुल बसवे, अभय बाग व अश्विनी बाग यांचा सन्मान करण्यात आला.

तीन वर्षांपासून लायन्स क्लब पंचवटी आणि आपलं महानगर हा सेल्फी विथ बाप्पाचा उपक्रम राबवत आहे. पर्यावरण पूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी हा प्रयत्न असतो. त्यास नाशिककर भरभरून प्रतिसाद देतात हे विशेष. : वैद्य विक्रांत जाधव, माजी प्रांतपाल, लायन्स क्लब

गणेशोत्सवातील मंगलमय वातावरणाला चार चाँद लावतांनाच पर्यावरण स्नेह देखील जपला जावा यासाठी हा उपक्रम राबवला गेला. मी स्वत: माझ्या घरापासून पर्यावरण पूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतो. : प्रशांत सोनजे, अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ नाशिक पंचवटी

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -