Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक भगवान गौतम बुद्धांच्या १०० मूर्तींची मिरवणूक; जिल्ह्यातील १०० गावात होणार स्थापना

भगवान गौतम बुद्धांच्या १०० मूर्तींची मिरवणूक; जिल्ह्यातील १०० गावात होणार स्थापना

Subscribe

नाशिक : भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्या वतीने मंगळवार दि. २ मे रोजी भगवान गौतम बुद्धांच्या १०० मूर्तींचा प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्त शहरातून सांयकाळी मिरवणूक काढण्यात आली. यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील १०० गावांमधील ५००श्रामनेर आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते, तसेच यानिमित्त रात्री गोल्फ क्लब येथे महाबौध्द धम्म परिषद, प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.

सांयकाळी ५ वाजता तपोवनातून भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात या मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर ही मिरवणूक जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएस मार्गे गोल्फ क्लब येथे आली. दरम्यान, ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. महाथेरो, भदंत बोधीपाल, भदंत धम्मरत्न, भदंत सुगत, भदंत आर्यनाग, भदंत शीलरत्न आदिंसह पंचशील ध्वजाचे प्रतिक असलेल्या छात्री हाती घेऊन शेकडो श्रामनेर आणि पांढरे वस्त्र परिधान केलेले हजारो स्त्री – पुरुष, समाज बांधव सहभागी झाले होते.

- Advertisement -

सदर १०० मूर्ती या प्रत्येकी साडेपाच फूट उंच असून फायबर मेटल पासून एकाच साच्यात तयार करण्यात आलेल्या आहेत. या बुद्ध मूर्ती प्रदान सोहळ्यानिमित्त दि. २ मे रोजी नाशिक शहरातून १०० बुद्ध मूर्तींची रंगीबेरंगी फुलांनी व निळ्या झेंड्यांनी सजवलेल्या छोटा हत्ती वाहन म्हणजेच १०० रथांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सांयकाळी ५ वाजता तपोवनातून भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात या मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर ही मिरवणूक जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएस मार्गे गोल्फ क्लब येथे आली. दरम्यान, ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. तसेच अनेक भीम गीते आणि बौध्द गीते यांनी परिसर दणाणून गेले होते. या सर्व मूर्त्यांचे जिल्ह्यातील १०० गावात प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

१०० रथांचा सहभाग

या मिरवणूकीत नाशिक, मालेगाव, चांदवड, येवला, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, सटाणा, कळवण, निफाड, देवळा आदि तालुक्यांचा समावेश आहे. या १०० मूर्ती या प्रत्येकी साडेपाच फूट उंच असून फायबर मेटल पासून एकाच साच्यात तयार करण्यात आलेल्या आहेत. या बुद्ध मूर्ती प्रदान सोहळ्यानिमित्त दि. २ मे रोजी नाशिक शहरातून १०० बुद्ध मूर्तींची रंगीबेरंगी फुलांनी व निळ्या झेंड्यांनी सजवलेल्या छोटा हत्ती वाहन म्हणजेच १०० रथांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -