घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रव्यावसायिक खूनप्रकरण : पोलीस पथके मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशकडे रवाना

व्यावसायिक खूनप्रकरण : पोलीस पथके मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशकडे रवाना

Subscribe

नाशिकरोड : व्यावसायिक शिरीष सोनवणे खून प्रकरणातील गुन्हेगारांच्या तपासाची दिशा निश्चित करत गुन्हेगारांपर्यंत पोहचण्यासाठी पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्यासह पोलीस अधिकारी मंगळवारी (दि.१३) दिवसभर नाशिकरोड पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. मालेगाव येथे खून केल्यानंतर गुन्हेगार मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशच्या दिशेने गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त करत तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु केला आहे. घटनास्थळावरुन गुन्हेगारांच्या शोधासाठी सात पथके रवाना केल्याचे सुत्रांनी सांगितले.

नाशिकरोडच्या एकलहरे रोड भागातील स्वस्तीक फर्निचर कारखान्याचे मालक शिरीष सोनवणे यांचे ९ सप्टेबर रोजी अपहरण करुन खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोनवणे यांचा खून करण्यामागील कारणे स्पष्ट होत नसल्याने शहर व ग्रामीण पोलीस बुचकळ्यात पडले आहेत, पोलिसांनी कारखान्यातील कामगार व जवळच्या लोकांची कसून चौकशी सुरु असली तरी हातात काहीच लागले नसल्याने खून करण्यामागे आर्थिक, व्यावसायिक आहे की अजून वेगळे याचा तपास सुरु आहे, गुन्हेगार व गुन्ह्यात वापरलेले वाहन यांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी मालेगावच्या घटनास्थळा पर्यंतचे रस्ते, महामार्ग, टोलनाके येथील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जात असून गुन्हेगार खून केल्यानंतर मालेगाव वरुन मध्य प्रदेश, गुजरात किंवा उत्तरप्रदेशच्या दिशेने गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -