घरमहाराष्ट्रनाशिकजागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त शुक्रवारी कार्यक्रम

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त शुक्रवारी कार्यक्रम

Subscribe

जागतिक मासिक पाळी दिनाच्या पार्श्वभूमीवर (२८ मे) आपलं महानगर, प्रभाग सभापती हर्षा बडगुजर व नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक पाळी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या पार्श्वभूमीवर (२८ मे) आपलं महानगर, प्रभाग सभापती हर्षा बडगुजर व नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक पाळी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार (ता. ३१) सायंकाळी ५ वाजता सावतानगर येथील क्रॉम्प्टन हॉलमध्ये होणार्‍या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी चौमाल यांचे मासिक पाळी काळात स्रियांकडून होणार्‍या चुकीमुळे वाढलेला कॅन्सरसारख्या आजारांचा धोका याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हर्षा बडगुजर, नगरसेवक सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वैभव देवरे, सामाजिक कार्यकर्त्या सोनल देवरे, आपलं महानगरचे मुख्य संपादक संजय सावंत, निवासी संपादक मिलिंद सजगुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, तसेच ‘आपलं महानगर’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -