घरमहाराष्ट्रनाशिकआरोग्य संवर्धनाचं भान देणारा जागर

आरोग्य संवर्धनाचं भान देणारा जागर

Subscribe

‘आपलं महानगर’, लायन्स क्लब व प्रज्ञाज फिटनेस अ‍ॅण्ड हेल्थ तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

बदलत्या जीवनशैलीतील चुका सुधारून आयुष्याला उत्साह आणि ऊर्जा देणारा दृष्टीकोन जागतिक आरोग्य दिनी झालेल्या विशेष आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमातून मिळाला. वैद्यकीय व लाईफ कोच क्षेत्रातील तज्ज्ञांनी रोजच्या जगण्यात करावयाच्या छोट्या व मोठ्या बदलांबाबत महत्वपूर्ण टिप्स दिल्या. या सोबत सांगितिक व्यायामानेही नवा जोश भरण्याबरोबरच व्यायामाविषयीही नवा विचारही दिला.

दैनिक ‘आपलं महानगर’, लायन्स क्लब पंचवटी आणि प्रज्ञाज हेल्थ अ‍ॅण्ड फिटनेस यांच्या वतीने रविवारी येथील लायन्स क्लब सभागृहात आयोजित विशेष आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी गोदावरी बँकेच्या अध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, अवकाश शास्त्रज्ञ डॉ.अपूर्वा जाखडी, ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य विक्रांत जाधव, पुणे येथील व्याख्याते विनय सातपुते, फिटनेस कन्सल्टंट प्रज्ञा भोसले-तोरसकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष अरुण अमृतकर, सचिव रितू चौधरी, वरिष्ठ सदस्य ओमप्रकाश पेठे, ‘आपलं महानगर’चे निवासी संपादक मिलिंद सजगुरे आदी उपस्थित होते.

तज्ज्ञांनी दिल्या आरोग्य संवर्धनाच्या टिप्स..

  • शाश्वत आरोग्यासाठी आरोग्यदायी शैली स्वीकारा.
  • आपल्या शरीराचे, मनाचे ऐका.
  • आहार, विहार आणि मनाची सांगड घाला
  • प्रत्येक ऋतूमानानुसार आहारात बदल करा
  • प्रकृती ओळखून व्यायाम प्रकार निवडा
  • बौद्धिक फिटनेससाठी अध्यात्माचा आधार घ्या
  • दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा
  • व्यक्तिगत बरोबर सामाजिक आरोग्याकडे लक्ष द्या
  • कामाच्या स्वरुपानुसार आहाराचे नियोजन करा
  • गावाचा हॅपिनेस इंडेक्स वाढवा
  • माहिती, ज्ञान कृतीत उतरवा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -