घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक जिल्ह्यात २९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

नाशिक जिल्ह्यात २९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Subscribe

थर्टी फर्स्टवर लक्ष; ग्रामीण पोलिसांकडून ४१ तळीरामांना शासन

 नाशिक : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना नियमांचे उल्लंघन करणार्‍या बेशिस्त वाहनचालक आणि तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ४१ तळीरामांवर कारवाई केली. तर अवैध मद्य विक्री व वाहतूकप्रकरणी १२ गुन्हे दाखल केले. तसेच एका हुक्का पार्लरवर कारवाई केली. ग्रामीण पोलिसांनी मालमता व शरीराविरुद्ध गुन्हे करणार्‍या आरोपींवर २९२ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या.

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या सुचनेनुसार नाशिक जिल्ह्यात ४० पोलीस ठाणेनिहाय महामार्ग, चेकपोस्ट ठिकाणी बॅरिकेट्स लावून नाकाबंदी करणात आली होती. पोलिसांनी जिल्ह्यातील रिसॉर्ट, हॉटेल्स, ढावे, पर्यटन व धार्मिक स्थळांवर करडी नजर ठेवली होती. तर नाशिक शहर पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत कडक बंदोबस्त ठेवला होता. शहर पोलिसांनी शुक्रवारी (दि.३१) रात्री ८ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत शहरात मुंबई नाका, सारडा सर्कल, कॉलेज रोड, गंगापूर नाका, मालेगाव स्टॅण्ड, दिंडोरी रोडवर बंदोबस्त ठेवला होता. पोलीस बंदोबस्तात पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह २ हजार पोलीस सहभागी झाले होते. रात्री १० वाजेनंतर कडक बंदोबस्त करण्यात आला होता. मुख्य रस्त्यांवर ५ पोलीस निरीक्षक, १३ पोलीस उपनिरीक्षक, २ सहायक पोलीस उपनिरीक्षक, ९० पोलीस कर्मचारी तळीरामांवर कडक नजर ठेवून होते.

- Advertisement -

शहर वाहतूक शाखेतर्फे शहरात युनिट १ ते ४ मध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी अतिवेगाने वाहने, मद्यप्राशन करुन धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, रॅश ड्रयव्हिंग करणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, रॉगसाईडने वाहन चालविणे, विनाहेल्मेट, विनासिटबेल्ट वाहन चालविणार्‍यांवर कारवाई केली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -