घरमहाराष्ट्रनाशिकप्रॉमिस डे : ग्रीटिंग्जचा भाव कायम

प्रॉमिस डे : ग्रीटिंग्जचा भाव कायम

Subscribe

व्हॅलेंटाइन डे ची उत्कंठा शेगेला

नाशिक : प्रेम करणे जेवढं सोपे, तितकेच ते सांभाळत शेवटपर्यंत टिकवणे अत्यंत अवघड असते. भावनेच्या भरात आपण जोडीदाराला वाट्टेल ते वचन अर्थात प्रॉमिस देऊन टाकतो आणि ते वचन पाळण्याची वेळ आली की चांगलीच दमछाक होते. म्हणूनच शनिवारी (दि.११) साजरा होत असलेल्या प्रॉमिस डेसाठी हटके अशी ग्रीटिंग्ज बाजारात दाखल झाली आहेत.अलवार नात्याला सहजपणे शब्दांत गुंफणार्‍या आणि निःशब्द राहूनही आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ग्रीटिंग्ज हा सर्वात सोपा पर्याय मानला जातो. आजच्या डिजिटल युगातही ग्रीटिंग्जचा भाव काही कमी झालेला नाही. त्यासाठीच यंदा विविध प्रकारचे, रंगसंगती असलेले ग्रीटिंग्ज बाजारात दाखल झाले आहेत.

ग्रिटींग कालबाह्य होण्याच्या मार्गावर असताना तरुणांनी यंदा व्हॅलेंटाइन वीकमध्ये मात्र प्रत्येक डेसाठी वेगवेगळ्या ग्रीटिंग्जद्वारे आपल्या भावना जोडीदाराकडे व्यक्त केल्याचे दिसून आले. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक धुमधडाक्यात सुरू आहे. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डेनंतर शनिवारी प्रॉमिस डे साजरा केला जाणार आहे. आवडत्या व्यक्तीला वचन देण्यासाठी तरुणाई ग्रीटिंग्जसोबतच पर्सनल शुभेच्छा संदेश पाठवताना दिसून येत आहेत. म्हणूनच, या दिवशी कुवतीप्रमाणे आवडत्या जवळच्या व्यक्तीला वचन द्यायला हरकत नाही.

- Advertisement -

प्रॉमिस करतांना अशी घ्या काळजी

’प्रॉमिस डे’ व्हॅलेंटाइन विक मधला सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. या दिवसापासून प्रेमीयुगल त्यांच्या भावी आयुष्याची स्वप्न पाहायला सुरुवात करतात. यात आपल्या पार्टनरला आयुष्यभर साथ देण्याचे प्रॉमिस केले जाते. पण प्रॉमिस करतांना आपल्याला झेपेल आणि आपण केलेले प्रॉमिस पूर्ण करू असेच प्रॉमिस आपण केले पाहिजे. जर आपण खोटे प्रॉमिस केले तर दोघांना मनस्ताप सहन देखील करावा लागू शकतो.

मागील दोन ते तीन वर्षांपासून ग्रीटिंग्जची विक्री होत नव्हती. परंतु, व्हॅलेंटाइन्स वीकमध्ये ग्रीटिंग्जची रेकॉर्ड ब्रेक विक्री होत आहे. खासकरून प्रॉमिस डेच्या ग्रीटिंग्जला युवकांची विशेष मागणी दिसून आली. ३० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत ग्रीटिंग्ज उपलब्ध आहेत. – पवन खरात, ग्रीटिंग्ज विक्रेता

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -