घरमहाराष्ट्रनाशिकरोजगार हमीतून ६८४ शाळांना संरक्षक भिंत

रोजगार हमीतून ६८४ शाळांना संरक्षक भिंत

Subscribe
  •  नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या 684 शाळांना संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय ग्रामपंचायत विभागाने घेतला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि.10) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यासंदर्भात आदेश दिले होते. तत्पूर्वी, ग्रामपंचायत विभागाने याची कार्यवाही करत जिल्ह्यातील 7 शाळांची संरक्षक भिंत उभारली आहे. या निर्णयामुळे संरक्षक भिंत नसलेल्या एकूण 826 पैकी 684 शाळांना एकाच वर्षात भिंत मिळणार आहे. उर्वरित शाळांना जागेची अडचण भासल्यानेे त्यांचा यात समावेश झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व शाळांच्या संरक्षक भितीचा विषय मार्गी लागला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 3266 शाळा आहेत. त्यापैकी 2438 शाळांना यापूर्वीच संरक्षक भिंत आहे. ज्या तालुक्यातील शाळांना संरक्षक भिंत बांधायची आहे, तेथील गटशिक्षणाधिकारी हे यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करतील. शाळानिहाय कामांना मंजूरी दिली जाणार आहे.
    महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्हा परिषदेने सर्व शाळांची संरक्षक भिंत उभारली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही असाच प्रयोग राबवण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाला दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करत या विभागाने 2022-23 या आर्थिक वर्षाच्या आराखड्यामध्ये 684 शाळांचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे नांदगाव तालुक्यातील कासारी या शाळेची संरक्षक भिंतही बांधून पूर्ण झाली आहे. अशी साधारणत: सात कामे झाल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले. उर्वरित शाळांचे प्रस्ताव सादर झाले असून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या वर्षाअखेर शाळांची कामे पूर्ण होतील. संरक्षक भिंतीला आवश्यक निधी हा उपलब्ध जागेनुसार मंजूर केला जात आहे.

    तालुकानिहाय शाळांची संख्या

  • बागलाण : १२८
  • येवला : १४४
  • त्र्यंबकेश्वर : १९
  • निफाड : ३६
  • इगतपुरी : २३
  • कळवण : ३४
  • सुरगाणा : ५०
  • नांदगाव : ३७
  • पेठ : ४४
  • सिन्नर : ३८
  • दींडोरी : ११
  • मालेगाव : ९४
  • नाशिक :०९
  • चांदवड : १४
  •  देवळा : ०३
पालकमंत्री दादा भुसे यांच्या आदेशानुसार शाळांचा आराखडा तयार केला असून कामेही सुरु झाली आहेत. कासारी येथील शाळेची संरक्षक भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आराखड्यात मंजूर सर्व शाळांची संरक्षक भिंत मार्च 2023 पर्यंत पूर्ण होतील. – रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग (जि.प.)
Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -