घरमहाराष्ट्रनाशिकसार्वजनिक बांधकाम अभियंत्यांचे काम बंद आंदोलन

सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांचे काम बंद आंदोलन

Subscribe

दोषींवर कारवाई करण्याची मागणी, सार्वजनिक बांधकाम अभियंता संघटनेकडून खेड येथील घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता बामणे व उपअभियंता प्रकाश गायकवाड यांना खेड् नगराध्यक्ष वैभव खेडेकर व इतर गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी जगबुडी नदीवरील कामाच्या संदर्भात विचारणा करीत येथील पुलाच्या कथड्यास बांधून टाकीत अमानुष वागणूक देत शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ आज नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संघटना व जलसंपदा विभागाच्या अभियंता संघटनेने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन देत निषेध व्यक्त करीत दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व जलसंपदा नाशिक येथील कनिष्ठ अभियंता संघटनेचे अभियंता तसेच दोषींवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले आहे. प्रसंगी संघटनेचे इंजि. चव्हाण, इंजि. सचिन शेळके, डी जि ठाकरे, गुंजाळ, मेचकुल रावसाहेब आदींसह सर्व सदस्य तसेच इतरही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -