घरमहाराष्ट्रनाशिकरहाडींना मिळतेय परवानगी, डीजेला मात्र यंदाही बंदीच

रहाडींना मिळतेय परवानगी, डीजेला मात्र यंदाही बंदीच

Subscribe

नाशिक : पेशवेकाळापासून सुरू असलेली नाशिक शहरातील रहाडींची परंपरा यंदाही कायम असून, त्यासाठी परवानगी देण्याला पोलिसांनी सुरुवात केली आहे. नाशिककरांना या रहाडींमध्ये मनसोक्त डुंबता येणार असले तरी डीजेवरील बंदी मात्र यंदाही कायम राहणार आहे.

रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रहाडींसाठी आलेल्या अर्जांची छाननी आणि परवानग्यांची प्रक्रिया सुरू आहे. यंदाही डीजेचा दणदणाटावर पोलिसांनी निर्बंध लादले आहेत. पारंपरिक वाद्यांचा वापर करुन रंगपंचमी साजरी करता येईल.

- Advertisement -

यंदा रंगपंचमी दणक्यात साजरी करण्यासाठी आयोजकांसह तरुणाई सज्ज झाली आहे. मात्र, पोलिसांनी रंगपंचमी साजरी करताना निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तरुणाईचा काहीसा हिरमोड झाला आहे. पोलीस आयुक्तांनी होळी, धुलीवंदन, शिवजयंती, रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर १ ते १५ मार्च २०२२ पर्यंत मनाई आदेश काढले आहेत. स्फोटक पदार्थांना मनाई करण्यात आली आहे. दगड, भाले, तलवारी, काठ्या, बंदुका आदी शस्त्रे, हत्यारे बाळगणे, जमा करण्यास मनाई करण्यात आली आहे. रंगपंचमीसाठी भद्रकालीसह अन्य भागांतील सार्वजनिक मंडळांनी पोलिसांकडे अर्ज केले असून, पोलिसांकडून छाननीनंतर सशर्त परवानगी दिली जात आहे. मात्र, डीजे लावण्यास मनाई करण्यात आली आहे. रंगपंचमी साजरी करताना पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

रहाडींच्या परवानगीसाठी पोलीस स्टेशननिहाय अर्ज आलेले आहेत. छाननी करुन त्यांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजे वाजविण्यासाठी कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे. : प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -