Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक मातोश्री फार्म हाऊसमध्ये आयपीएलवर सट्टा; तिघांना अटक

मातोश्री फार्म हाऊसमध्ये आयपीएलवर सट्टा; तिघांना अटक

Subscribe

घोटी रोडवर नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई; ७ मोबाईल, लॅपटॉप,टी.व्ही., सेट टॉप, कार जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता.१३) सिन्नर ते घोटी रोडवरील बेलु शिवारातील मातोश्री फार्म हाऊसवर छापा टाकत आयपीएल मॅचवर सट्टा लावणार्‍या तिघांना अटक केली आहे. छाप्यात पोलिसांनी ५ लाख ७८ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

प्रेम ताराचंद थावराणी, हरिष ऊर्फ बॉबी प्रेम थावराणी (दोघेही रा.साई जैन कॉलनी, सौभाग्यनगर, देवळाली कॅम्प), जय अभय राव (रा.मातृछाया अपार्टमेंट, सौभाग्यनगर, देवळाली कॅम्प) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हरिष थावराणी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शनिवारी (ता. १३) आयपीएल मालिकेत किंग्स इलेव्हन पंजाब व रॉयल चॅलेंजर बँगलोर या संघांचा क्रिकेट सामना सुरू होता. दरम्यान, सिन्नर – घोटी रोडवर मातोश्री फार्म हाऊसमध्ये सामन्यावर बेटींग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना मिळाली. पथकाने सिन्नर ते घोटी जाणारे रोडवर बेलु गाव शिवारात मातोश्री फार्म हाऊसवर छापा टाकला. त्यावेळी तिघेजण लॅपटॉप व मोबाईलव्दारे लोकांकडून पैसे घेऊन सट्टा खेळताना व खेळविताना आढळले. पोलिसांनी छाप्यात ७ मोबाईल, लॅपटॉप,टी.व्ही., सेट टॉप, कार असा एकूण ५ लाख ७८ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तिघांवा सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक करपे, स्वप्निल नाईक, नवनाथ गुरूळे, रामभाऊ मुंढे, रवी शिलावट, दीपक आहिरे, शिवाजी जुंदरे, प्रितम लोखंडे, अमोल घुगे, संदीप हांडगे, हेमंत गिलबिले, नीलेश कातकाडे, सचिन पिंगळ, प्रदीप बहिरम, गोकुळ सांगळे यांनी केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -