घरमहाराष्ट्रनाशिकमालधक्यातून रेल्वेला १७ कोटीचे उत्पन्न

मालधक्यातून रेल्वेला १७ कोटीचे उत्पन्न

Subscribe

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी कांद्याकडे वळाल्याने यंदा कांद्याचे बंपर उत्पादन निघाले. यामुळे रेल्वेला एकाच महिन्यात १७ कोटी ४० लाख रूपयाचे उत्पन्न मिळाले आहे.

यंदा जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट आहे. पाऊस नसल्याने विभागातील बहुतांश गावात दुष्काळ जाहीर केला आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तसेच जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी कांद्याकडे वळाल्याने यंदा कांद्याचे बंपर उत्पादन निघाले. यामुळे रेल्वेला एकाच महिन्यात १७ कोटी ४० लाख रूपयाचे उत्पन्न मिळाले आहे. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याबरोबर लाल कांद्याची विक्री होत असुन या कांद्याचा निकस करण्यासाठी लासलगाव, मनमाड, निफाड व खेरवाडी येथून महिन्याभरात ५१ रॅकमधून सुमारे ८० हजारहून अधिक टन कांदा उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यात पाठविण्यात आला आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाला कोट्यवधीचे उत्पन्न मिळाले आहे. कांद्याची मागणीमध्ये वाढ होऊनही कांदा घसरण सुरुच असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. जिल्ह्यातील कांदा रेल्वे, रस्तामार्गे विविध राज्यात पाठविला जातो. त्या राज्यातून जवळच्या इतर देशातदेखील कांदा पाठविला जातो. मध्य रेल्वेच्या विभागातुन लासलगाव, निफाड व खेरवाडी, मनमाड येथून कांद्याचे रॅक भरून पाठविले जातात.

सर्व बाजार समितीमध्ये बंपर आवक सुरूच

लासलगाव येथून डिसेंबर महिन्यात रेल्वेच्या ११ रॅक (३९२ वॅगन), मनमाड येथून १६ रेक (६५६ वॅगन), निफाड येथून १२ रेक (४७० वॅगन) व खेरवाडी येथून ७ रॅक (३०० वॅगन) कांदा पाठविला. जिल्ह्यातील सगळ्याच बाजार समितित कांद्याची आवक मोठया प्रमाणात आवक होत आहे. रेल्वेने बिहार पाटणाजवळील फतवा, पश्चिम बंगालमधील चितपूर, आसाममधील चांगसरी डांकुनी, पश्चिम बंगालमधील राणीपात्रा, उत्तर प्रदेश या ठिकाणी डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत एकूण ५१ रॅक (२०१४ वॅगन) मधून सुमारे ८० हजारहून अधिक टन कांदा पाठविला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -