घरमहाराष्ट्रनाशिकदोन आठवड्यांनंतर नाशिकला पावसाचे पुनरागमन

दोन आठवड्यांनंतर नाशिकला पावसाचे पुनरागमन

Subscribe

जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार आगमन आणि मोठे नुकसान केल्यानंतर दडी मारलेल्या पावसाने तब्बल १७ दिवसांनंतर सोमवारी, २४ जूनला दुपारी हजेरी लावली.

जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार आगमन आणि मोठे नुकसान केल्यानंतर दडी मारलेल्या पावसाने तब्बल १७ दिवसांनंतर सोमवारी, २४ जूनला दुपारी हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी होऊन गारवा निर्माण झाला. मात्र, अचानक आलेल्या पावसाने चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ झाली.

१ ते ६ जूनदरम्यान शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठे नुकसान केले होते. मात्र, निदान हा पाऊस दुुष्काळावर मात करेल अशी अपेक्षा असतानाच पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे बळीराजाची चिंता अधिकच वाढली होती. नाशिकमध्ये दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाले. तर, जिल्ह्याच्या मालेगाव, देवळा, येवला तालुक्यांत दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था आणी तळ गाठणाऱ्या प्रमुख धरणांची स्थिती पाहता, जोरदार आणि संततधार पावसाची गरज आहे. तसे झाले तरच पाण्याच्या टँकरवर अवलंबून असलेल्या जनतेला दिलासा मिळून, शेतीच्या कामांनाही वेग येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -