घरमहाराष्ट्रनाशिकत्र्यंबकेश्वर मंदिरात पावसाचा अभिषेक

त्र्यंबकेश्वर मंदिरात पावसाचा अभिषेक

Subscribe

नाशिक - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर सध्‍या पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले असून धबधबा खळाळून वाहत आहे.

नाशिक बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर सध्‍या पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले आहे. डोंगरांच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबकेश्वर गावातील रस्ते काँक्रिटचे असून त्यावर वारंवार थर टाकण्यात आल्याने रस्त्यांची उंची वाढली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी मंदिर परिसरात शिरते. त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगमस्थान देखील आहे. मात्र, काँक्रिटीकरणाचा विळखा नदीपत्रालाही पडल्याने पावसाळ्यात नदीतली पाणी रस्त्यावर येते. परिणामी हलक्या स्वरूपाच्या पावसातही त्र्यंबकेश्वरला पूर परिस्थिती निर्माण होते.

- Advertisement -

 

ब्रह्मगिरीच्या डोंगर रांगांमधला धबधबा

नाशिक जिल्ह्यात दमदार झालेल्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहर पूर्णत: जलमय झाले आहे. तसेच अनेकांच्या घरात पाणी साचल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसचे अनेक ठिकाणी कार, दुचाकी पाण्यात बुडाले असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गोदावरीच्या उगम स्थानी काँक्रिटीकरण केल्यामुळे ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. पाणी बाहेर जाण्यासाठी अडथळा निर्माण होत असून पाणी शहराबाहेर जाण्याऐवजी साचत आहे. त्यामुळे नागरिकांना आणि भाविकांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर मंदिरात धबधबा खळाळून वाहत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – २४ तासांत मुसळधार पाऊस; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -