घरमहाराष्ट्रनाशिक‘राजधानी’ आता आठवड्यातून चार दिवस

‘राजधानी’ आता आठवड्यातून चार दिवस

Subscribe

आठवड्यातून दोनऐवजी चार दिवस धावणार ‘राजधानी’

दिल्लीला धावणार्‍या मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आता शुक्रवारपासून आठवड्यातून चार दिवस धावणार आहे. त्यामुळे नाशिककरांना दिल्ली कनेक्टिव्हिटी सोयीची होणार आहे.

लॉकडाऊनचे निर्बंध आणि कोरोना संसर्गामुळे उद्योग, व्यवसाय बंद असल्याने दिल्लीला जाणार्‍यांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे गाडीला प्रतिसाद कमी लाभल्याने तोटा वाढला होता. परंतु, लॉकडाऊन निर्बंध शिथील होताच दिल्लीला धावणार्‍या मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसबाबत शुक्रवारी मध्य रेल्वेने निर्णय घेतला आहे. दिल्लीला धावणार्‍या मुंबई- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसची वारंवारिता (फ्रिक्वेंसी) वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. आठवड्यातून दोनऐवजी चार दिवस ही गाडी दिल्लीला धावणार आहे. राजधानी एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणेच रोज धावेल, अशी आशा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे. शुक्रवारपासून मुंबईहून नाशिकरोडमार्गे गाडी मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी धावेल. दिल्लीहून ही गाडी बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी धावेल. ही गाडी पूर्ण आरक्षित असून, गाडीसाठी बुकिंग विशेष शुल्कासह आरक्षण केंद्र आणि वेबसाइटवर (www.irctc.co.in) उपलब्ध आहे. लॉकडाउनचे निर्बंध आणि कोरोना संसर्गामुळे उद्योग, व्यवसाय बंद असल्याने दिल्लीला जाणार्‍यांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे गाडीला प्रतिसाद कमी लाभल्याने तोटा वाढला होता. त्यामुळे राजधानी एक्स्प्रेसची वारंवारिता कमी केली होती. ती आता वाढवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -