घरमहाराष्ट्रनाशिकस्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी व्हावी राजेंद्र बागूल यांची मागणी

स्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी व्हावी राजेंद्र बागूल यांची मागणी

Subscribe

नागरिकांच्या पैशाचा अनाठायी खर्च होत असल्याचा पत्राद्वारे आरोप

काँग्रेस नेते व माजी सभागृह नेता राजेंद्र बागूल यांनी स्वतः शहराच्या विविध भागात फिरून स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केली. या दरम्यान स्मार्ट सिटीचे सुरू असलेली रस्ते खोदकाम व ड्रेनेज, पाणीपुरवठा लाईपलाईन नादुरुस्त झाल्याचेही निर्दशनास आले. तसेच यापूर्वी पाण्याची व ड्रिनेज लाईनचे नुतनीकरण करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करत रस्त्याचे सपाटीकरण सुरू करण्यात आल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे.

कामामुळे पाण्याचा अपव्यय, ड्रेनेजचा वास येत असून, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी कमी दाबाने व काही भागात पाणी दोन-दोन महिने येत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. तसेच महापालिकेला अतिरिक्त खर्चाचा भार पडत असून नागरिकांच्या पैशाचा अनाठायी खर्च होत असल्याचा आरोप त्यांनी पत्राद्वारे केला आहे.पत्रामध्ये पाणीपुरवठा, ड्रेनेज, बांधकाम विभाग यांचा समन्वय नसल्याने नागरिकांना होणारा त्रास, निधीचा होणारा अपव्यय व वेळेचा र्‍हास टाळला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करत या प्रश्नाकडे आयुक्त यांनी स्वत: लक्ष घालण्याची मागणी केली आहे. तसेच काही ठिकाणी ड्रे्रनेज लाईनमधुन पाण्याच्या लाईन जोडल्या गेलेल्या आहेत. ज्या कार्यान्वित नाहीत; किंबहुना, पुरुन ठेवल्यासारख्या आथंरण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महापालिकेने या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -