घरमहाराष्ट्रनाशिकदिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली; पॅरा खेळाडूंचाही सन्मान

दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली; पॅरा खेळाडूंचाही सन्मान

Subscribe

नाशिक : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, दिव्यांगांच्या विशेष शाळा तसेच दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील १८ दिव्यांग शाळा व पुनर्वसन केंद्र यांमधील विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या रॅलीत सहभाग घेतला. मोदकेश्वर मंदिर येथे रॅलीचा समारोप झाला. महापालिक आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ झाला.

जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व सामाजिक संस्थांच्या वतीने मोदकेश्वर मंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे हे उपस्थित होते. जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. रत्नानिधी ट्रस्टच्या वतीने दिव्यांग अल्पदृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांना १० विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात चष्म्याचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब नाशिकच्या वतीने शासकीय अंधशाळेतील १० विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक सेन्सर असलेल्या दोन लक्ष रुपये किमतीच्या ब्लाइंड स्टीक्सचे वाटप करण्यात आले.

- Advertisement -
या शाळांचा सहभाग

श्रीमती माई लेले श्रवण विकास, विद्यालय, पडसाद कर्णबधिर विद्यालय, जागृती कर्णबधिर विद्यालय, विकास मंदीर मुकबधीर विद्यालय, प्रबोधिनी विद्यामंदीर, प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा, सुनंदा केले विद्यामंदीर, विकास मंदीर मतिमंद विद्यालय, विकास मंदीर मतिमंद कार्यशाळा, रुसी इराणी शाळा, मनाली मतिमंद विद्यालय, शासकीय अंधशाळा,नॅब कार्यशाळा, नाशिक नॅब भावना चांडक ब्लाइंड स्कूल, नॅब चंद्रभागाबाई बहुविकलांग शाळा, व्ही. एक्सेल स्कूल, सिद्धीविनायक मतिमंद शाळा, राष्ट्रीय दृष्टिहीन शाळांनी यात सहभाग घेतला. माई लेले शाळेच्या विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली. आदित्य शिंदे याने मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांचा सन्मान

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते समता पर्व व दिव्यांग सप्ताह कालावधीत झालेल्या स्पर्धांमधील प्रथम क्रमांक पटकावणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. पॅरा ऑलंम्पिक २०२२ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पदक प्राप्त क्रीडापटू सिध्दी भांडारकर (३ सुवर्ण पदक), स्वंयम पाटील (२ सुवर्ण, १ रौप्य), गौरी गर्जे (१ रौप्य, १ कास्य) यांचा देखील गौरव करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -